Download App

वाल्मिक कराडला VIP ट्रीटमेंट असेल तर कारवाई करा, ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे स्पष्टच बोलले

Navnath Waghmare : संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) आणि खंडणी प्रकरणात तुरुंगात असणाऱ्या वाल्मिक कराडाला

  • Written By: Last Updated:

Navnath Waghmare : संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) आणि खंडणी प्रकरणात तुरुंगात असणाऱ्या वाल्मिक कराडाला (Walmik Karad) व्हीआयपी ट्रीटमेंट (VIP Treatment) दिली जात असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यामुळे आरोपी वाल्मिक कराडाला व्हीआयपी ट्रिंटमेंट दिली जात असा आरोप काॅंग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला आहे. तर आता जर वाल्मिक कराडाला व्हीआयपी ट्रिंटमेंट मिळत असेल तर प्रशासनाने कारवाई केली पाहिजे अशी प्रतिक्रिया ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी दिली आहे. ते आज जालन्यात माध्यमांशी बोलत होते.

यावेळी नवनाथ वाघमारे म्हणाले की, तुरुंगात वाल्मिक कराडाला व्हीआयपी ट्रिंटमेंट दिली जात आहे की नाही हे आपल्याला माहिती नाही. कोणीतरी आरोप करत असेल कारण की, राज्यात सध्या अनेक प्रकरण सुरु आहे, मात्र फक्त बीडला फोकस करण्यात येत आहे. राज्यात ओबीसींच्या अनेक तरुणांना मारहाण होत आहे. ते सोडून फक्त बीड प्रकरणात मीडिया ट्रायल सुरु आहे. मात्र तरीही देखील जर वाल्मिक करडाला व्हीआयपी ट्रिंटमेंट मिळत असेल तर याबाबत प्रशासनाने चौकशी करुन कारवाई केली पाहिजे. अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी दिली आहे.

तसेच त्यांनी यावेळी पुणे येथील स्वारगेट (Swargate Crime Case) अत्याचार प्रकरणातील आरोपीला भरचौकात फाशी झाली पाहिजे अशी मागणी देखील सरकारकडे केली आहे. तर यावेळी त्यांनी राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांच्यावर देखील टीका केली आहे.

मोठी बातमी! मढीतील ‘ती’ ग्रामसभा नियमबाह्य…, मुस्लिम व्यावसायिकांवरील बंदी उठणार

गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी केलेलं वक्तव्य चुकीचं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कदम यांचे कान टोचले पाहीजे. योगेश कदमांच्या घरी माता – भगिनी नसतील त्यामुळे ते असं बोलून गेले असेल, अशी टीका गृहराज्य मंत्री योगेश कदम यांच्यावर ओबीसी नेते आणि आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी केली.

follow us