Video : आव्हाडांनी गृहराज्यमंत्र्यांची लाज काढताच फडणवीसांनी उलगडून सांगितलं योगेश कदमांचं विधान

  • Written By: Published:
Video : आव्हाडांनी गृहराज्यमंत्र्यांची लाज काढताच फडणवीसांनी उलगडून सांगितलं योगेश कदमांचं विधान

CM Devendra Fadnavis on Yogesh Kadam : स्वारगेट बस स्थानकात घडलेली अत्याचाराची घटना शांततेत घडली, असं विधान गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केल्यानंतर यावरून नवीन वादाला तोंड फुटलं. (Fadnavis) घटनेच्यावेळी पीडित तरुणीने कोणताही प्रतिकार केला नाही, असंही मंत्री कदम यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. त्यांच्या या वक्तव्यावरून जोरदार टीका होत आहे.

Video : शेवटच्या माहितीवरून आरोपीला पकडलं; कुणी दिली माहिती? पुणे पोलीस आयुक्त काय म्हणाले?

याबाबत आता राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या राजकारणातील अनुभवावरून योगेश कदम यांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. त्यासोबत मंत्री म्हणून पहिल्यांदा कार्यकाळ सांभाळत असल्याचं सांगत त्यांची पाठराखणही केली आहे.यावेळी बोलताना फडणवीस यांनी राज्यमंत्री म्हणून योगेश कदम यांनी जी भूमिका घेतली त्यावर त्यांना प्रश्न विचारण्यात आले. त्यावरून त्यांनी कदम यांना काही महत्वाच्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला.

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?

जितेंद्र आव्हाड म्हणाले, ‘योगेश कदम म्हणतात की पीडिता ओरडली नाही. यांना काही लाज, लज्जा, शरम? तुम्हाला लाज वाटते की नाही? तुम्हाला आया-बहिणी आहेत की नाही? एखाद्या स्त्रीवर बलात्कार झाल्यावर तुम्ही म्हणता की ती ओरडली नाही. म्हणजे तुम्हाला म्हणायचं तरी काय? असा सवाल त्यांनी केला. योगेश कदम लहान आहेत, माझं त्यांच्या वडिलांना सांगणं आहे की तुम्ही फार परिपक्व आहात. सांगा त्यांना की असं बोलायचं नसतं. आता ते (योगेश कदम) मंत्री आहेत, राज्य मंत्रिमंडळाचा प्रतिनिधी आहे’ असा सल्लाही त्यांनी दिला.

संजय राऊत काय म्हणाले?

बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये बलात्काराची घटना घडते आणि त्या घटनेवर बोलताना गृहराज्यमंत्री काय बोलतात? ते म्हणाले की सर्व घटना शांततेत घडल्यामुळे बाहेर काही कळलं नाही. गृहराज्यमंत्र्यांची ही अशी भूमिका? एका मुलीवर बलात्काराची घटना घडते आणि गृहराज्यमंत्री म्हणतात की तिने फोर्सफुली किंवा स्ट्रगल केलं नाही. अशा पद्धतीचा शब्द त्यांनी वापरला. खरं म्हणजे आपले गृहराज्यमंत्री दिव्यच आहेत, असं म्हणत खासदार संजय राऊतांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या वक्तव्यावर टीका केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube