घटना लपवली नाही पण…, स्वारगेट प्रकरणात गृहराज्यमंत्री योगेश कदमांची पोलिसांना क्लीनचिट

  • Written By: Published:
घटना लपवली नाही पण…, स्वारगेट प्रकरणात गृहराज्यमंत्री योगेश कदमांची पोलिसांना क्लीनचिट

Yogesh Kadam On Swargate Bus Depot Case : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर 26 वर्षीय तरुणीवर अत्याचाराची संतापजनक घटना घडल्याने संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे. तर दुसरीकडे पोलिसांनी स्वारगेट एसटी आगारात (Swargate Bus Depot Case) तरुणीवर अत्याचार झाल्याची बातमी बाहेर येऊ दिली नाही असा देखील आरोप करण्यात येत आहे.

तर या सर्व आरोपींवर गृहराज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी स्पष्टीकरण देत तरुणीवर अत्याचार झाल्याची बातमी पोलिसांनी बाहेर येणार नाही, याची जाणीवपूर्वक दक्षता घेतली होती. ही बातमी बाहेर आली असतील तर कदाचित आपल्याला आरोपीचे आता जे संभाव्य लोकेशन मिळाले आहे, ते मिळू शकले नसते. ही बातमी बाहेर आली असती तर आरोपी दत्तात्रय गाडे (Dattatreya Gade) सावध होऊन पळून गेला असता. त्यामुळे ही घटना लपवण्याचा प्रयत्न झालेला नाही. केवळ गुप्तता बाळगण्यात आली होती असे स्पष्टीकरण गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिले. ते आज पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

पुण्यातील आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की, परवा दिवशी स्वारगेट बस स्थानकात जी घटना घडली याबाबत मी माहिती घेतली आहे. त्यादिवशी स्वारगेट पोलिसांकडून रात्री 12 ते पहाटे सहा वाजेपर्यंत कितीवेळा गस्त घालण्यात आली, हे सीसीटीव्हीत दिसत आहे. स्वारगेट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि त्यांचे पथक रात्री दीड वाजता एसटी स्टॅंडच्या आवारात आले होते. त्यानंतर रात्री तीन वाजता देखील पोलीसांचे पथक स्वारगेट बस स्थानकावर आले होते. त्यामुळे पोलिसांकडून दुर्लक्ष झाले, ते सावध नव्हते. या आरोपात तथ्य नाही, असं योगेश कदम पत्रकार परिषदेमध्ये म्हंटले आहे. तसेच पुढील काही तासात आरोपी दत्तात्रय गाडेला पोलीस अटक करणार असा विश्वास देखील यावेळी त्यांनी व्यक्त केला.

फिक्स्ड डिपॉझिट ते एलपीजी गॅस…1 मार्चपासून ‘हे’ मोठे बदल होणार, परिणाम थेट खिश्यावर

पुढे बोलताना या पत्रकार परिषदेमध्ये योगेश कदम म्हणाले की, स्वारगेटमध्ये परवा जी घटना घडली आहे त्यामध्ये कुठलाही स्ट्रगल किंवा फोर्सफुल कृती झाली नाही. ही घटना घडली तेव्हा शिवशाही बसच्या आजुबाजूला 10 ते 15 लोक होते. पण तरुणीने विरोध केला नसल्याने कोणालाही शंका आली नाही आणि त्यामुळे आरोपीला गुन्हा करता आला. असं देखील गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube