मोठी बातमी! मढीतील ‘ती’ ग्रामसभा नियमबाह्य…, मुस्लिम व्यावसायिकांवरील बंदी उठणार

Madhi Gram Sabha : भटक्यांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नगर जिल्ह्यातील पाथर्डी (Pathardi) तालुक्यातील मढी (Madhi Gram Sabha) येथील यात्रा सध्या चर्चेत आहे. या यात्रेमध्ये मुस्लिम समाजाच्या व्यावसायिकांना बंदी घालण्यात आल्याचा ठराव ग्रामस्थांच्यावतीने घेण्यात आला आहे. यावरून मोठा गदारोळ झाला. ग्रामसभेत घेण्यात आलेल्या या निर्णयावर आता मोठी अपडेट समोर आली आहे.
मढी गावात 22 फेब्रुवारीला झालेली ग्रामसभा नियमबाह्य असल्याची माहिती पाथर्डी गटविकास अधिकाऱ्यांनी दिली आहे. यामुळे मढी यात्रेत मुस्लिम दुकानदारांना बंदी करण्यासह सभेतील सर्वच ठराव आपोआपच रद्द करण्यात येणार आहे. अशी माहिती समोर येत आहे.
सध्या अहिल्यानगरमधील मढी गाव चर्चेत आहे. मढी गावात कानिफनाथ महाराजांचं मंदिर आहे. दरवर्षी या गावात कानिफनाथ महाराजांची (Kanifnath Maharaj) यात्रा भरते. देशभरातून मोठ्या संख्येनं लोक इथं येतात. मात्र यंदाच्या यात्रेत मुस्लीम समाजाच्या व्यावसायिकास दुकान लावू न देण्याचा ठराव मढी गावच्या ग्रामसभेनं घेतला आहे. मुस्लीम समाज यात्रेदरम्यान काही परंपरांचं पालन करत नसल्याचं ग्रामसभेनं पारित केलेल्या ठरावात नमूद करण्यात आलंय. मात्र आता गटविकास अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालात ही ग्रामसभा नियमबाह्य असल्याचं म्हटल्यामुळे हा ठराव रद्दबातल झाला आहे.
श्री कानिफनाथ महाराजांनी दहाव्या शतकात पाथर्डी तालुक्यातील मढी येथे गडावर संजीवन समाधी घेतली. यानिमित्त दरवर्षी मढी येथे होळी ते गुढीपाडवा या कालावधीत यात्रौत्सव साजरा केला जातो. या यात्रेला महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक, गोवा, कोकण आदी प्रांतांमधून मोठ्या संख्येने भाविक येतात.
Oldest Test Cricketer Death : क्रिकेटविश्वात शोककळा, सर्वात वयोवृद्ध कसोटी क्रिकेटपटूचे निधन
मढी येथील यात्रेचा प्रारंभ होळीपासून होतो. रंगपंचमी हा यात्रेचा मुख्य दिवस असतो. या दिवशी नाथसमाधी दिन आणि संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त लाखो भाविक श्रीकानिफनाथांच्या समाधी दर्शनासाठी मोठी गर्दी करतात. दरम्यान यात्रेचा काळ हा दुखवट्याचा काळ असतो, मात्र मुस्लिम व्यापारी आमच्या परंपरा पाळत नाहीत आणि त्यामुळे भाविकांच्या भावनांना ठेच पोहोचते, असं ग्रामस्थांनी सांगितलं.