मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) नेते व माजी मंत्री नवाब मलिक ( Nawab Malik ) यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर पडली आहे. मलिकांना पुन्हा नव्या कोर्टात जावे लागणार आहे. मलिकांचे वकील चीफ जस्टीस यांच्याकडे दाद मागणार आहेत. नवाब मलिक यांना ईडीने ( ED ) मनी लाँड्रींग प्रकरणात अटक केलेली आहे.
नवाब मलिक हे महाविकास आघाडी सरकारच्या काळात अल्पसंख्याक विभागाचे मंत्री होते. त्यांच्यावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊत इब्राहिम याची बहिण हसीना पारकर हिच्याशी व्यवहार केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. तसेच 1993 च्या मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी असलेल्या काही जणांशी देखील त्यांनी व्यवहार केल्याचा आरोप मलिक यांच्यावर करण्यात आलेला आहे.
भास्कर जाधवांना राजकारणातून संपवणार, कदम-जाधवांचं रंगलं वाकयुद्ध
नवाब मलिक यांच्यावर कुर्ल्यातील एका हॉस्पिटलमध्ये न्यायालयाच्या परवानगीने उपचार सुरु आहेत. नवाब मलिक यांच्या वकिलांकडून अनेक दिवसांपासून जामिनासाठी अर्ज करण्यात येतो आहे. आज त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होती. परंतु त्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी आता पुढे ढकलली आहे. यानंतर मलिक यांचे वकील चीफ जस्टीस यांच्याकडे दाद मागणार आहेत.
शरद पवारांकडून चंद्रकांत पाटलांचा पाणउतारा; म्हणाले, ‘शहाण्या माणसाबद्दल विचारा…’
दरम्यान हसीना पारकर, सलीम पटेल व मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी सरदार खान आणि नवाब मलिक यांनी गोवावाला कंपाउंडमधील मुनीरा प्लंबर या महिलेची तीन एकर जमीन कट रचून बेकायदेशीर हस्तगत केल्याचा आरोप मलिकांवर करण्यात आलेला आहे. मलिक यांनी गोवावाला कंपाउंडमधील जागा भाडेतत्वावर देऊन त्यातून आलेल्या पैशांमधून वांद्रे, कुर्ला येथील फ्लॅट्स आणि उस्मानाबादमधील शेतजमीन खरेदी केली असल्याचा आरोप ईडीने केला आहे. तर, मलिन यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.
…म्हणून सुनील गावस्कर थेट ऑस्ट्रेलियन निवडकर्त्यांवर भडकले