Devendra Fadnavis : केंद्र सरकार आणि देशातील विविध राज्य सरकारकडून गेल्या काही दिवसांपासून नक्षलवादाविरोधात मोठी कारवाई करण्यात येत आहे. तर आता महाराष्ट्रातील फक्त दोन तालूक्यात नक्षलवाद असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसेभेत (Maharashtra Legislative Assembly) बोलताना दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत जनसुरक्षा विधेयक (Public Safety Bill) मांडलं. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जनसुरक्षा विधेयकावर 12,500 सूचना आणि हरकती जनतेकडून आल्या होत्या. जनतेकडून आलेल्या सूचना आणि हरकतींचा विचार करुन या विधेयकामध्ये 3 महत्वाचे बदल करण्यात आले आहे. पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गेल्या काही वर्षात देशातील काही राज्यात नक्षलवाद वाढला होता. त्यामुळे भारतीय संविधानाविरोधात अनेक जण लढत होते. मात्र केंद्र सरकार आणि देशातील विविध राज्यांमधील सरकारने यावर काम केल्याने आता हळूहळू नक्षलवाद संपुष्टात येत आहे.
बोलण्याच्या ओघात शिंदेंच्या दिल्लीवारीचं गुपित शिरसाटांनी फोडलं; गदारोळ होताच….
महाराष्ट्रातपूर्वी चार जिल्ह्यांमध्ये माओवाद दिसून येत होता मात्र आता फक्त दोन तालुक्यात माओवाद आहे. पुढच्या एक वर्षात हे देखील राहणार नाही अशी ग्वाही देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना दिली .
माओवादी संघटना लोकशाही आणि भारताचे संविधान मानत नाही. जनसुरक्षा विधेयकासारखा कायदा करण्यास केंद्राने राज्यांना सुचवल आहे. देशातील 4 राज्यात असा कायदा अस्तित्वात असल्याची माहिती देखील यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
शिंदेंचा शिलेदार गोत्यात; आमदार शिरसाटांना आयकर विभागाची नोटीस, स्वतः दिली माहिती
तसेच जनसुरक्षा कायद्याचा दुरुपयोग होणार नाही त्यामुळे सर्व सदस्यांनी एकमताने मान्यता द्यावी असा आवाहन देखीय विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.