प्रफुल्ल साळुंखे
(विशेष प्रतिनिधी)
Tomato High Prices : देशभरात टोमॅटो(Tomato) चांगलाच भाव खाताना पाहायला मिळतोय. उत्तर भारतात पावसानं एकच हाहाकार माजवला आहे. त्या भागातील शेतीपिकांचं मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे भाजीपाल्याच्या दरांत मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातल्यात्यात टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. एक किलो टोमॅटोसाठी 140 ते 150 रुपये मोजावे लागत आहेत. टॉमेटोच्या वाढलेल्या भावामुळे सामान्य माणसाच्या जेवणातून टॉमेटो गायब झाला आहे. पण अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची टॉमेटो संदर्भातील 48 वर्षांपूर्वीची एक आठवण समोर आली आहे.
राजकारणात येण्यापूर्वी अजितदादा हे शेती करायचे. त्यावेळी त्यांचे शेती संलग्न इतर व्यवसायही होते. शेती संदर्भातील त्यांची एक आठवण राज्याचे माजी मंत्री व राष्ट्रवादीचे आमदार असलेले राजेश टोपे यांनी अजितदादांवरील ‘परिसस्पर्श’ या आपल्या पुस्तकात लिहून ठेवली आहे.
राजेश टोपे यांनी त्या पुस्तकात म्हटले आहे की, “अजितदादांनी शेतीला आधुनिकतेची जोड देत अनेक उपक्रम राबविले. त्याकाळी बारामतीत टोमॅटोचे एकरी ८० हजार रूपयांचे उत्पन्न घेऊन त्यांनी सर्वप्रथम विक्रम करून दाखविला. शेती, दुग्धोत्पादन असो वा पोल्ट्रीफार्म त्यांनी स्वतः प्रत्येक कामाचा अनुभव घेतला आहे.”
अजित पवार यांनी १९७५ च्या नंतर शेती करायला सुरवात केली त्यांनी सर्वप्रथम टॉमेटोची लागवड केली . यात त्यांना त्याकाळी ८० हजार रुपये एकरी दर मिळाला होता. त्या वेळी ते जिल्यात प्रथम आले. राजेश टोपेंनी यासह अजितदादांच्या इतरही अनेक आठवणी आपल्या पुस्तकात नमुद केल्या आहे.
अजितदादांना अर्थखातं; गोगावले, शिरसाटांचा पत्ता कट : भाजपच्या बड्या नेत्याचे मोठे गौप्यस्फोट
दरम्यान, सध्या देशभरात टॉमेटो महाग झाल्यामुळे अचानकपणे अजितदादांच्या या आठवणीला उजाळा देता आला आहे. त्यातच राष्ट्रवादीतील राजकीय परिस्थितीमुळे अजितदादांचे नाव चांगलेच चर्चेत आले आहे. त्यात आता या आठवणीची आणखी एक भर पडली आहे.