Download App

25 वर्ष हा लहान कालखंड नाही; राष्ट्रवादीच्या स्थापनादिनी जयंत पाटलांचे गौरवोद्गार

Jayant Patil :  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज आपला वर्धापनदिन (NCP Anniversary) मोठा उत्साहात साजरा करत आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पंचविसाव्या वर्षात पदार्पण करत आहे. वर्धापनदिनानिमित्त पक्षातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील बोलत होते. यावेळी त्यांनी गेल्या 25 वर्षातील पक्षातील स्थितीचा आढावा घेतली व सध्या राज्यात सुरु असलेल्या घटनांवरदेखील भाष्य केले.

पक्षाने गेल्या 25 वर्षांमध्ये अनेक चढ उतार पाहिले. यश- अपयश पाहिले. एवढ्या वर्षांमध्ये शरद पवार यांनी एक हाती पक्षाचे नेतृत्व केले. पंचवीस वर्ष हा लहान कालखंड नाही, पण मर्यादित कालखंड आहे. महाराष्ट्र राज्यात अनेक क्रांतिकारक निर्णय शरद पवार मुख्यमंत्री असताना घेतले. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यावर अनेक निर्णय घेतले होते. हा पक्ष राज्यातील प्रमुख पक्ष आहे. ज्या पक्षावर टीका केल्याशिवाय सत्तेत बसलेल्यांना एकही दिवस जात नाही असा आमचा पक्ष आहे, असे जयंत पाटील म्हणाले.

पाटील, टोपे, पटेल अन् अजितदादा; वर्धापनदिनी सुप्रिया सुळेंनी केलं तोंडभरून कौतुक

भारतातील एक अनुभवी नेतृत्व आपल्याकडे आहे. शरद पवार साहेबांवर विकृत टीका व्यक्त केली जात असून आमच्या विरोधकांना इतर पक्ष महत्त्वाचा वाटत नाही. पण आपला पक्ष छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे. त्याच विचाराने पक्षाची पुढची वाटचाल ही असेल. पण आज आपण पाहतो राज्यात जातीय तेढ व धार्मिक तेढ निर्माण केली जात आहे. वातावरण अशांत करून राजकीय पोळी भाजली जात आहे. गेल्या दीड दोन महिन्यात तणावाचे वातावरण तयार करण्यात येत आहे. याचा एकच अर्थ आहे की निवडणूक जवळ आली असून यांना धार्मिक ध्रुवीकरणातून मतांचा राजकारण करायचं आहे, असे म्हणत जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.

बावनकुळे हे तुम्हाला पटतं का?; अजितदादांनी सुनावले

तसेच आम्ही महाराष्ट्र दंगा मुक्त ठेवू यासाठी आमच्या पक्षाचा कार्यकर्ता पुढे राहील. राज्यात शांतता राहावी यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. मात्र आज कोणी वादग्रस्त स्टेटस ठेवतं, कोणी तलवारी बाहेर काढत यामुळे वातावरण कलुशीत करण्याचा प्रयत्न काही जण करतात, अशी अवस्था राज्यात कधी नव्हती, अशी खंत जयंत पाटील यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.

Tags

follow us