पाटील, टोपे, पटेल अन् अजितदादा; वर्धापनदिनी सुप्रिया सुळेंनी केलं तोंडभरून कौतुक

पाटील, टोपे, पटेल अन् अजितदादा; वर्धापनदिनी सुप्रिया सुळेंनी केलं तोंडभरून कौतुक

Supriya Sule : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज आपला वर्धापनदिन (NCP Anniversary) मोठा उत्साहात साजरा करत आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पंचविसाव्या वर्षात पदार्पण करत आहे. वर्धापनदिनानिमित्त पक्षातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पक्षाच्या 24 वर्षांतील वाटचालीचा आढावा घेतला. तसेच सध्याचे राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या धोरणांवर कठोर टीका केली.

सुळे म्हणाल्या, 24 वर्षांच्या प्रवासाकडे ज्यावेळी आपण वळून पाहतो तेव्हा असं दिसतं की 19 वर्षे आपण सत्तेतच राहिलो आणि सहा वर्ष विरोधात राहिलो. जन्मापासून सत्तेत होतो. म्हणजे 80 टक्के पास झालेला पक्ष म्हणजे आपण मेरिटमध्ये आहोत. इतकी वर्ष लोकांची सेवा करण्याची संधी आपल्याला मिळाली.

मोदी-शहांच्या रडारवर शिंदेंचे पाच मंत्री; गच्छंतीनंतरच होणार मंत्रिमंडळ विस्तार

संघर्षाच्या पहिल्या टप्प्यात आपल्याला राज्यात सत्ता मिळाली पण देशात मिळाली नाही. प्रफुल्ल पटेलांवर मोठी जबाबदारी टाकली. त्यांनी मंत्रिपदाच्या काळात चांगले काम केले. म्हणून तर आज लोकांना वंदे भारत ट्रेन परवडत नाही पण विमानाने सुरक्षित प्रवास करू शकतात. हे काम युपीए सरकारच्या काळात झालं.

सगळ्यात जास्त अर्थमंत्री कोण असतील तर ते जयंत पाटील. त्यांनी अर्थसंकल्प चांगल्या पद्धतीने मांडला. त्यानंतर ती जबाबदारी अजितदादांकडे आली. त्यांनीही अतिशय चांगले काम केले. त्यानंतर पाच वर्षे विरोधात होतो. पुढे महाविकास आघाडीचं सरकार आलं. त्या काळात कोविडमध्ये नेत्यांनी मार्गदर्शन केले. ज्यावेळी कोविडच्या कामांचा उल्लेख केला जाईल तेव्हा राजेश टोपे यांचे नाव घेतले जाईल. इतके चांगले काम त्यांनी कोविडच्या संकटाच्या काळात केले. 24 वर्षांचा हा प्रवास संघर्षाचा आणि समाधानाचा आहे. या काळात अनेक जण पक्षाला सोडून गेले पण कार्यकर्ता तेथेच राहिला. ही आपल्या पक्षाची खरी ताकद आहे, असे सुळे यांनी सांगितले.

केंद्र आणि राज्य सरकारचे अपयश

सत्ता नाही म्हणून पक्ष खूप आनंदी आहे असे काही नाही. तुम्ही आज परिस्थिती पाहताय जे आज सत्तेत आहेत त्यांना सत्तेत राहताना अस्वस्थता नक्कीच वाटत असावी. कारण आपण असतो तर मला नक्कीच वाटली असती. ज्या पद्धतीचे असुरक्षित वातावरण आज राज्यात आहे. कोल्हापूर असेल. नगर असेल सोलापूरला झालेली घटना असेल. अमरावतीची घटना असेल ही काही पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्राला शोभणारी नाही.

हे केंद्र व राज्य सरकारचे अपयश आहे. आज विरोधी पक्ष म्हणून आपली जबाबदारी आहे. आज महत्वाच्या जागेवर आपण उभे आहोत. तेव्हा देशाच्या आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठी लढत राहू, असे सुळे म्हणाल्या.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube