बावनकुळे हे तुम्हाला पटतं का?; अजितदादांनी सुनावले

बावनकुळे हे तुम्हाला पटतं का?; अजितदादांनी सुनावले

Ajit Pawar On Chandrashekhar Bawankule :  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी आली असून यानंतर त्यांच्या कन्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलिस आयुक्तांची भेट घेतली. यानंतर सर्वस्तरातून प्रतिक्रिया आहेत. या घटनेची राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने दखल घेतली आहे. त्यानंतर आज राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शरद पवारांना आलेल्या धमकीवरुन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना सुनावले आहे.

दाभोळकर यांच्या हत्या झाल्याचे सर्वांना माहिती आहे. बावनकुळेंकडून ही अपेक्षा नाही. त्यांनी सरळ मान्य केले पाहिजे की आमच्यामाणसाकडून चूक झाली. हे असं होता कामा नये. महाराष्ट्राची एक संस्कृती आहे ती सगळ्यांनी सांभाळली पाहिजे. वेगवेगळी मतमतांतर असू शकतात. आज जर त्यांचे कार्यकर्ते बोलायला लागले तर उद्या इतर पक्षांचे कार्यकर्ते बोलायला लागतील. त्यातून इतर समस्या बाजूला राहतील. विकासाचे प्रश्न बाजूला पडतील, असे अजितदाददा म्हणाले.

https://letsupp.com/maharashtra/maharashtra-supriya-sule-speech-in-ncp-25th-anniversary-mumbai-56004.html

बावनकुळेंना जर माझा फोन झाला तर मी बोलणार आहे की, बावनकुळे तुम्ही काय बोलता. तुमचा दाभोळकर करु अस म्हटल्यानंतर ती धमकी नाही असं म्हणणं तुमच्या सद्सद् विवेक बुद्धीला पटत का?, असे म्हणत अजित पवारांनी बावनकुळेंना सुनावले आहे.

मोदी-शहांच्या रडारवर शिंदेंचे पाच मंत्री; गच्छंतीनंतरच होणार मंत्रिमंडळ विस्तार

दरम्यान, काल अजितदादांनी धमकीला देणाऱ्या व्यक्तीचे नाव सौरभ पिंपळकर असल्याचे म्हटले होते. त्याच्या ट्विटरच्या बायोवर भाजप कार्यकर्ता असा उल्लेख आहे. तो खरंच भाजपचा कार्यकर्ता आहे की नाही हे माहीत नाही. पण या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, असे ते म्हणाले होते. तसेच आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष  आपला वर्धापनदिन (NCP Anniversary) मोठा उत्साहात साजरा करत आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पंचविसाव्या वर्षात पदार्पण करत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube