Download App

भाजपनं राष्ट्रवादी फोडली; जळगावच्या जाहीर सभेत पवारांची कबुली

Sharad Pawar Vs Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांनी शिवसेना, राष्ट्रवादी फोडली असल्याची कबुलीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांनी दिली आहे. शरद पवार जळगाव दौऱ्यावर असून जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आयोजित सभेत शरद पवार बोलत होते. यावेळी शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे.

Bharat : ‘इंडिया’च नाही तर ‘या’ नावांनीही भारताची ओळख; जाणून घ्या, इतिहास

शरद पवार(Sharad Pawar) म्हणाले, पंतप्रधान मोदींनी मागील नऊ वर्षांत काय केलं? मागील नऊ वर्षांत मोदींनी शिवसेना , राष्ट्रवादी फोडली आहे, मोदींनी फक्त फोडाफोडीचंच राजकारण केलं असून हातात असलेल्या सत्तेचा वापर लोकांसाठी नाहीतर विरोधकांच्या मागे ईडी, सीबीआय लावण्यासाठी केला असल्याचा गंभीर आरोप शरद पवार यांनी केला आहे.

Horoscope Today: ‘वृषभ’ राशीला मिळणार भाग्याची साथ! जाणून घ्या काय सांगतय आजचं राशीभविष्य…

राज्यातल्या अनेक नेत्यांच्या मागे ईडीचं सत्र लावून मोदींनी तुरुंगात टाकलं आहे. नवाब मलिक अनिल देशमुखांसारख्या अनेक नेत्यांना मोदींनी तुरुंगात टाकलं आहे. मागे एकदा भोपाळच्या सभेत पंतप्रधान मोदींनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीका केली. अनेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले, जर कोणी चुकीचं काम केलं असेल तर नक्कीच चौकशी करुन कारवाई करावी, असं खुलं आव्हान पुन्हा एकदा शरद पवारांनी मोदींनी दिलं आहे.

Maratha Reservation Protest : फडणवीसांची क्षमायाचना योग्य पण… ; जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम

खानदेशचा इतिहास अभिानास्पद :

काँग्रेसचं पहिलं अधिवेशन जळगाव जिल्ह्यातच झालं होतं. जळगावात झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात अनेक नेत्यांनी हजेरी लावली होती. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासह पंडित जवाहरलाल नेहरुदेखील या अधिवेशनासाठी जळगावात आले होते. त्यामुळे खानदेशचा इतिहास अभिमानास्पद असल्याचं शरद पवार म्हणाले आहेत.

सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांची चिंता नाही :
राज्यात आजची परिस्थिती अवघड आहे. शेतकऱ्यांच्या व्यथांबद्दल सत्ताधाऱ्यांना चिंता नाही, राज्या पाऊस नाही, धऱणात पाणी नाही, जनावरांनाही पाणी नाही त्याची चिंता सरकारला नाही, शेतकऱ्यांसमोर दुष्काळाचं संकट असून देशाची सत्ता चुकीच्या लोकांच्या हाती गेली असून ही स्थिती बदलायची असल्याचंही ते म्हणाले आहेत.

Tags

follow us