Neet Exam Scam : वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या ‘नीट’ परीक्षेत जो गोंधळ झालाय त्याबद्दल देशभरात एक संतापाची लाट निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांसह विरोधी पक्ष मोठ्या आक्रमकतेने या प्रश्नावर लढताना दिसतोय. (Neat paper leak) अशातच आता लातूर जिल्ह्यातून धक्कादायक माहिती समोर आलीय. (Neet) नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तर प्रत्येकी तब्बल ४० ते ५० लाख रुपये द्या, अशी मागणी पालकांकडे होत आहे. तुमच्या पाल्याला ७२० पैकी ६५० गुण मिळतील असं आश्वासन दिलं जातय. अशी शिक्षण व्यवस्थेला हादरा देणारी माहिती येथून समोर आली आहे.
दोन संशयित शिक्षकांची चौकशी NEET Exam: पेपरफुटी प्रकरणी सीबीआय अॅक्शन मोडमध्ये; पहिला गुन्हा दाखल
तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्रात लातूर ही शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखलं जातय. मात्र, येथूनच शिक्षणात मोठा गोंधळ निर्माण केला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ‘नीट’ परीक्षेची तयारी करण्यासाठी राज्याच्या वेगवेगळ्या भागातील मुले-मुली मोठ्या संख्येने येथे येत असतात. त्यामुळे ‘मिनी कोटा’ असाही लातूरचा उल्लेख होवू लागला आहे. पण, शिक्षण क्षेत्रातील गैरव्यवहार समोर येत असल्याने लातूरकरांमधून दु:ख व्यक्त केलं जातय. दरम्यान, ‘नीट’च्या पेपरफुटीत सहभाग असल्याच्या संशयावरून जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकवणाऱ्या लातूरच्या दोन संशयित शिक्षकांचीही नांदेडच्या ‘एटीएस’कडून चौकशी झाली.
४० ते ५० लाख रुपयांना पेपर देतात काही लोकांना बांबूच लावला पाहिजे, CM शिंदेंचे संजय राऊतांवर टीकास्त्र
येथील क्लासचालक म्हणाले, लातुरमध्ये ‘नीट’चा संभाव्य पेपर देणारे रॅकेट कार्यरत असून ते तब्बल ४० ते ५० लाख रुपयांना पेपर देतात. ५० लाख देवू शकतील, अशाच मुलांच्या पालकांची यादी तयार करून ते त्यांच्यापर्यंत पोचतात. संभाव्य प्रश्नपत्रिका देवू म्हणणाऱ्यांकडं खरोखरच परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न असतात का? अशी विचारणा विद्यार्थी-पालकांकडून विश्वासार्ह क्लासचालकांकडे आणि समुपदेशकांकडे होत असते अशी खळबळजनक माहिती समोर आली आहे.
दोन संशयित शिक्षकांची रात्रभर चौकशी
या ‘नीट’ परीक्षेच्या पेपरफुटीच्या संशयावरून जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकविणाऱ्या लातूरमधील दोन शिक्षकांना नांदेडच्या ‘एटीएस’ पथकाने रात्री उशिरा ताब्यात घेवून पोलीस अधिक्षक कार्यालयात सखोल चौकशी केली. त्यानंतर काल दुपारी त्यांना सोडून देण्यात आलं. जवळपास १४ तासांनी त्यांची सुटका झाली. पण, महत्त्वाची कागदपत्रे जप्त करून पुन्हा चौकशीला बोलावलं जाईल, असंही त्यांना सांगण्यात आलं आहे. दरम्यान, या प्रकरणाबाबत योग्यवेळी माहिती जाहीर केली जाईल, असं पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी सांगितल आहे.