पुन्हा ‘NEET’च्या निकालात घोळ; राजकोट केंद्रावरील 70 टक्के विद्यार्थी पात्र; 12 विद्यार्थ्यी झाले 700 प्लस

पुन्हा ‘NEET’च्या निकालात घोळ; राजकोट केंद्रावरील 70 टक्के विद्यार्थी पात्र; 12 विद्यार्थ्यी झाले 700 प्लस

NEET Exam Result : देशभरात नीट पेपर लीक प्रकरणाचं वादळ काही शांत होताना दिसत नाही. NEET परीक्षेबाबत देशातून नवनव्या घटना वारंवार समोर येत आहेत. या घटनांमुळे होतकरू विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न सध्या ऐरणीवर आलाय. याला जबाबदार असणाऱ्यांचा शोध सध्या सुरू आहे. (NEET Exam) सर्वोच्च न्यायालयानेही या प्रकरणी कठोर भूमिका घेतल्याचे दिसत असून, न्यायालयाच्या आदेशानंतर एनटीएने शहर आणि केंद्रनिहाय निकाल जाहीर केले असून, त्यात अनेक आश्चर्यकारक आकडे समोर आले आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुण्यात! भाजपच्या चिंतन बैठकीत विधानसभेचा मास्टर प्लॅन ठरणार

गुजरातच्या राजकोट केंद्रातील तब्बल 70 टक्के विद्यार्थी नीट परीक्षेत पात्र ठरले आहेत. यापैकी 12 विद्यार्थ्यांना 700 पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. इतर काही केंद्रांवरूनही अशीच धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. यानंतर पुन्हा एकदा नीट परीक्षेत गैरप्रकार झाले आहेत का? अशी चर्चा सुरू झाली आहे. एनटीएने जाहीर केलेल्या निकालाच्या आकडेवारीवरून असं समोर आलंय की, आर. के. विद्यापीठ, राजकोट, गुजरात केंद्रात एकूण 1968 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून, त्यापैकी 1387 विद्यार्थ्यांनी पात्रता गुण प्राप्त केले आहेत.

एकाच केंद्रातील जवळपास ७०% पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी भारतातील वैद्यकीय महाविद्यालयातील जागांसाठी पात्रता गुण प्राप्त केले आहेत. हा आकडा संपूर्ण भारतातील सर्व केंद्रांपेक्षा जास्त आहे, ज्यामुळे 700 पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची सर्वाधिक संख्या असलेले राजकोट केंद्र बनलं आहे. याशिवाय या केंद्रात देशभरातील १.८ लाख वैद्यकीय जागांसाठी पात्रता गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही सर्वाधिक आहे.

राज्यानुसार १२२ विद्यार्थी

राजकोट (आर. के. विद्यापीठ, राजकोट, गुजरात) केंद्र क्रमांक 22701 च्या विश्लेषित डेटावरून असं दिसून येतं की, या केंद्रातील 12 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी 700 गुण मिळवले, 115 विद्यार्थ्यांनी 650 गुण मिळवलं, 259 विद्यार्थ्यांनी 600 गुण मिळवले, 403 विद्यार्थ्यांनी 600 गुण मिळवले तर 598 विद्यार्थ्यांनी 500 पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. गुजरातच्या डेटावरून असंही दिसून आलं आहे की, अहमदाबादमधील दिल्ली पब्लिक स्कूल सेंटरमध्ये 12 विद्यार्थ्यांनी 700 पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. एकूणच, गुजरातमध्ये राज्यानुसार १२२ विद्यार्थी आहेत ज्यांनी ७०० पेक्षा जास्त गुण मिळवली आहेत, त्यापैकी १९ एकट्या राजकोटचे आहेत.

24 लाख विद्यार्थ्यी भ्रष्टाचार त्यांच्याकडून अन् वसुली तुमच्याकडून; जयंत पाटलांनी सांगितला रिंगरोडचा AटूZ काळा बाजार

सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच यावर्षी NEET UG परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा राज्य, शहर आणि केंद्रनिहाय डेटा जाहीर करण्याचे आदेश दिले होते. यानंतर एनटीएने शनिवारी सर्व 24 लाख विद्यार्थ्यांचा डेटा आपल्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करून दिला आहे. NTA द्वारे जारी केलेल्या डेटाचे विश्लेषण दर्शविते की, भारतातील प्रतिष्ठित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये जागांसाठी पात्र उमेदवारांची सर्वाधिक संख्या फक्त गुजरातमधील राजकोट आणि राजस्थानमधील सीकरमध्ये आहे. राजकोटमध्ये वैद्यकीय परीक्षेला बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी 70 टक्क्यांहून अधिक विद्यार्थी परीक्षेत पात्र ठरले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube