NEET Result 2023 : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने NEET UG परीक्षा 2023 (NEET UG 2023) चा निकाल जाहीर केला आहे. तामिळनाडूतील प्रबंजन जे आणि आंध्र प्रदेशातील बोरा वरुण चक्रवर्ती हे या परीक्षेत अव्वल ठरले आहेत. दोन्ही विद्यार्थ्यांनी 99.99 टक्के गुण मिळवले आहेत. या परीक्षेच्या निकालाची अनेक दिवसांपासून विद्यार्थी वाट पाहत होते, मात्र आज नॅशनल टेस्टिंग एजन्सीने निकाल जाहीर केला आहे.
नीट यूजीसाठी 20,87,462 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. 499 शहरातील 4097 केंद्रावर परीक्षा पार पडली. 14 परीक्षा केंद्र देशाबाहेरही होते. मराठी, हिंदी, गुजरातीसह 13 भाषांमध्ये नीट परीक्षा पार पडली होती. महाराष्ट्रातून श्रीनिकेत रवी याने पहिला क्रमांक पटकावला आहे तर देशातून सातवा क्रमांकावर आहे.
मोदींकडून बळीराजाच्या डोळ्यात धुळफेक, राज्य मुल्य आयोगाने शिफारस केलेल्या हमीभावाला केराची टोपली
NEET UG 2023 चा निकाल पाहण्यासाठी, सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट म्हणजे neet.nta.nic.in वर जा. यानंतर, मुख्यपृष्ठावर येथे NEET UG 2023 Result नावाची लिंक दिली जाईल, त्यावर क्लिक करा. असे केल्याने एक नवीन पेज उघडेल. या पृष्ठावर तुम्हाला तुमचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख टाकावी लागेल. आता तपशील प्रविष्ट करा आणि सबमिट करा. असे केल्याने, निकाल तुमच्या संगणकाच्या स्क्रीनवर दिसतील. ते येथून तपासा, डाउनलोड करा आणि तुम्हाला हवे असल्यास प्रिंट काढा.
NTA declares the result/NTA scores/rank of National Eligibility cum Entrance Test (NEET-UG) 2023 pic.twitter.com/K1Rg0nH8HU
— ANI (@ANI) June 13, 2023