राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं जोरदार वारं वाहत आहे, (Election) येत्या दोन डिसेंबर रोजी नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर तीन डिसेंबर रोजी मतमोजणी करण्यात येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारला देखील रंगत आली आहे, दरम्यान अनेक ठिकाणी यावेळी शिवसेना शिंदे गट आणि भाजप आमने-सामने असल्याचं पहायला मिळत आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा हीच परिस्थिती आहे.
मालवणमध्ये मतदारांना पैसे वाटले जात असल्याची तक्रार होती, त्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे नेते निलेश राणे यांनी आता थेट एका भाजप कार्यकर्त्याच्या घरावर धाड टाकत स्टिंग ऑपरेशन केलं आहे. निलेश राणे यांना या भाजप कार्यकर्त्याच्या घरामध्ये पैशांची बॅग आढळून आली आहे. त्यानंतर निलेश राणे हे अधिक आक्रमक झाले आहेत, त्यांनी या सर्व प्रकाराचा व्हिडीओ देखील काढला आहे. एवढंच नाही तर आणखी पैशांच्या तीन ते चार बॅगा असल्याचा दावा देखील निलेश राणे यांनी केला आहे.
बीडमध्ये ५१९ पैकी ४३९ परवानाधारकांकडून शस्त्र जमा, काय आहे कारण?
या व्हिडीओमुळे राज्यात खळबळ उडाली असून, आता शिवसेना शिंदे गट आणि भाजपातील संबंध आणखी ताणले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान दुसरीकडे मात्र हे पैसे आपल्या व्यावसायाचे असल्याचा दावा या भाजप पदाधिकाऱ्याकडून करण्यात आला आहे, तसेच भाजप नेते आशिष शेलार यांनी देखील निलेश राणे यांचे हे आरोप फेटाळून लावले आहेत. ही माहिती खोटी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच निवडणूक अधिकारी आणि पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. निलेश राणे यांनी थेट या भाजप कार्यकर्त्याच्या घरात घुसून हा व्हिडीओ काढला आहे. निवडणुकीसाठी पैसे वाटले जात असल्याचा आरोप निलेश राणे यांनी केला आहे. मात्र दुसरीकडे या कार्यकर्त्याने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. हे आपल्या बिझनेसचे पैसे असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
