Heavy Rain In Baramati Area : गेल्या अनेक वर्षांत पावसाच हे थैमान महाराष्ट्राने पाहिलं नव्हत. यावर्षी मात्र, मान्सूनला तब्बल पंधरा दिवस बाकी असाना पावसाने जे काही थैमान घातलय ते मोठं नुकसान देऊन जाणार आहे. (Baramati) काल पुणे जिल्ह्याला पावसाने झोडपून काढलंय. दरम्यान, बारामतीत नीरा डावा कालवा फुटला आहे. शेतांमध्ये आणि लोकांच्या घरांमध्ये पाणी गेलं आहे.
बारामतीत ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. या प्रचंड पावसामुळे बारामतीमधील निरा डावा कळवा फुटला आहे. पिंपळे लिमटेक या ठिकाणी कालवा फुटला आहे. त्यानंतर पंढरपूर महामार्गावर सकाळीसुद्धा तळ्यासारखी परिस्थिती आहे. कालवा फुटल्याने शेतीच मोठं नुकसान झालं आहे. त्याचबरोबर अनेक इमारती खचल्या आहेत. या खचलेल्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश अजित पवार यांनी दिले आहेत.
न्याय मिळायला थोडा वेळ लागेल पण;मी पुन्हा येईन पूजा खेडकर यांनी सांगितली ती A टू Z स्टोरी
या दुष्काळी संकटात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईतील सर्व कार्यक्रम रद्द केले. सोमवारी सकाळीच ते शेतीच्या बांधावर पोहचले. शेतीचे झालेल्या प्रचंड नुकसानीनंतर अजित पवार शेतकऱ्यांना दिलासा देत आहे. अधिकाऱ्यांना त्वरित पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. बारामतीच्या कंबळेश्वर गावात पाणी शिरले आहे. जेसीबीने पाण्याला वाट मोकळी करून दिली जात आहे.
बारामती तालुक्यातून वाहणाऱ्या निरा डावा कालव्याला पिंपळी लिमटेक या ठिकाणी भगदाड पडलं. या कालव्याचे सर्व पाणी नागरिकांच्या शेतात आणि घरामध्ये शिरलं आहे. मुसळधार पाऊस कोसळत असल्याने कालव्यात पाण्याचा प्रवाह प्रचंड वाढला आहे. कालव्याला पिंपळी लिमटेक भागात भगदाड पडल्याची माहिती मिळताच जलसंपदा विभागाने तातडीने नीरा डावा कालवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.