Nitesh Rane : भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यानंतर उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांच्याबद्दल मोठा गौप्यस्फोट केला आहे. राणे म्हणाले की, शरद पवार यांचा गट कॉंग्रेसमध्ये विलीन होणार ही अर्धी बातमी आहे. तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे दोन्हीही गट कॉंग्रेसमध्ये विलीन होणार आहे. ही पूर्ण बातमी आहे. अशी माहिती मला मातोश्रीचे अत्यंत निकटवर्ती असलेल्या एका व्यक्तीने दिली आहे. असं राणे म्हणाले ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
फडणवीसांच्या बनावट लेटर हेडवर सहा जणांच्या बदल्या : भांडाफोड होताच शिंदे सरकारचा मोठा निर्णय
यावेळी बोलताना राणे म्हणाले की, मातोश्रीचे अत्यंत निकटवर्ती असलेल्या एका व्यक्तीने मला माहिती दिली आहे की, ज्याप्रमाणे शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या बातम्या येत आहेत. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांचा गट देखील काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतो. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे लोक हे हाताच्या चिन्हावर निवडणुका लढतील.
‘जरांगेंनी लोकसभा लढवावी, आमचा पाठिंबा राहिल’; प्रकाश आंबेडकरांचे आवाहन
त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या अस्तित्वावर बोलाव. संजय राऊत यांनी हे विलिनीकरण करून घेण्याची सुपारी घेतलीय. तसेच उबाठा आणि पवार गट यांना तात्पुरते नाव आणि चिन्ह दिलेलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे का साथ काँग्रेस का हाथ हे लवकरच पाहायला मिळणार आहे. उद्धव ठाकरे जनपथकडे जाणार आहेत. संजय राऊत अमेरिकेचा पुढचा राष्ट्रपती आहे. राउटच्या बॅगेत नाइनटी गांजा असेल.
तसेच यावेळी राणे म्हणाले की, चंद्रकांत हंडोरे यांचं वाईट वाटतं. त्यांना बळीचा बकरा बनवला जात आहे. अशोक चव्हाण तुमच्या सोबत होते तेव्हा चालत होतं का? विधी मंडळाकडून पत्र दिलंय ते फार निर्णयक असेल. तसेच शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या दोन्ही पक्षांना अस्तित्व नाही. सुप्रिया सुळे मुख्यमंत्री हे मुंगेरीलाल के हसीन सपने आहेत. असंही यावेळी राणे म्हणाले.