‘जरांगेंनी लोकसभा लढवावी, आमचा पाठिंबा राहिल’; प्रकाश आंबेडकरांचे आवाहन

‘जरांगेंनी लोकसभा लढवावी, आमचा पाठिंबा राहिल’; प्रकाश आंबेडकरांचे आवाहन

Prakash Ambedkar : मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) लढवावी. जरांगे पाटील जर जालना मतदारसंघातून निवडणूक लढणार असतील तर त्यांना आमचा पाठिंबा असेल, असे मोठे विधान वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केले. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) जर लोकसभेत निवडून गेले तर त्यांना मराठा आरक्षणाचा मुद्दा संसदेत व्यवस्थितपणे मांडता येईल आणि ते जालन्यातून निवडूनही येतील, असा विश्वास आंबेडकर यांनी व्यक्त केला.

प्रकाश आंबेडकर यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना लोकसभा निवडणुक लढण्याची ऑफर दिली. आंबेडकर पुढे म्हणाले, आम्ही जरांगे पाटलांना राजकीय मेसेज दिला आहे. ही राजकीय लढाई आहे. त्यासाठी तुम्ही जालन्यातून अपक्ष निवडणूक लढवावी. त्यासाठी आमचा पाठिंबा राहिल. ओबीसींच्या ताटातले आरक्षण टिकणार नाही. ओबीसी आरक्षणाचं ताट वेगळंच असंल पाहिजे.

‘लोकसभा निवडणूक लढा’ प्रकाश आंबेडकरांचे मनोज जरांगे पाटलांना आवाहन

मनोज जरांगे पाटील पु्न्हा उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या प्रमुख दोन मागण्या आहेत. या मागण्या अधिवेशनात मान्य करण्याचे आश्वासन त्यांना सरकारने दिले आहे. लोकसभा निवडणुका असल्याने लवकरच आचारसंहिताही लागू होईल. त्यामुळे सरकारने याबाबतचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा. राज्य सरकारला अधिवेशन घ्यावं लागेल असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

महाविकास आघाडीच्या जागावाटपावरही त्यांनी भाष्य केले. आमची बैठक झाली. या बैठकीत आम्ही अंतिम मसुदा दिला आहे. अन्य पक्षांनी त्यांचा मसुदा दिला असेल तर पुढील बैठकीत चर्चा होईल. कुणाच्या काय मागण्या आहेत त्यावर चर्चा होऊन त्यानुसार निर्णय होईल. ज्या मुद्द्यावर निर्णय होणार नाही त्यावर सगळे पक्ष एकत्रित बसून एकमताने निर्णय घेतला जाईल, असे आंबेडकर म्हणाले.

Manoj Jarange : हात थरथरू लागले, नाकातून रक्तस्त्राव; मनोज जरांगेंची प्रकृती खालावली 

पाचव्या दिवशी जरांगेंची प्रकृती खालावली 

मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण (Manoj Jarange) उपोषणास सुरुवात केली आहे. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. यावेळचे त्यांचे उपोषण अधिक कठोर आहे. कारण त्यांनी या काळात पाणी घेतलेले नाही तसेच औषधोपचारासही नकार दिला आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. प्रकृतीची तपासणी करण्यासाठी डॉक्टर त्यांना विनवणी करत आहेत मात्र जरांगे पाटील त्यांच्या निश्चयावर ठाम आहेत. सरकारी अधकारी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र जरांगे यांनी कोणतीही तडजोड नाही आधी मागण्या पूर्ण करा आणि मगच या अशी भूमिका घेतली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube