Download App

संभाजीराजे छत्रपती-आंबेडकर एकत्र येण्याच्या चर्चांना पूर्णविराम; ‘त्या’ कृतीमुळे फिस्कटली बोलणी

पुणे : संभाजीराजे छत्रपती आणि प्रकाश आंबेडकर यांचे पक्ष एकत्र येत राज्याच्या राजकारणात नवा प्रयोग करणार असल्याच्या चर्चांना काही दिवसांपूर्वी उधाणं आलं होतं. मात्र या चर्चांना आता खुद्द संभाजीराजे छत्रपती यांनी पूर्णविराम दिला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाच्या कबरीवर आंबेडकर यांनी फुल वाहिली होती. मी त्यांना विद्वान समजत होतो. मात्र त्यांच्या या कृतीमुळे आपलं मतपरिवर्तन झालं आहे, असं म्हणत आपण त्यांच्यासोबत जाणार नसल्याचे संभाजीराजे यांनी स्पष्ट केले. ते पुण्यात बोलत होते. (no alliance between Sambhaji Raje Chhatrapati and Prakash Ambedkar for the upcoming elections)

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून संभाजीराजे छत्रपती यांनी स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. ते स्वतः देखील लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे बोलले जात आहे. तर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकरही आगामी निवडणुकांची तयारी करत आहेत. अशावेळी दोन्ही पक्ष एकत्र येऊन राज्याच्या राजकारणात नवा प्रयोग करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मे महिन्यात पुण्यात संभारीराजे आणि प्रकाश आंबेडकर यांची भेटही झाली होती. त्यांच्यात तब्बल पाऊणे दोन तास बैठक झाली होती.

मुंबईच्या एन्ट्री पॉईंटवरील टोलनाक्यांवर आता ‘ठाकरें’चा वॉच; मनसेचे कॅमेरे ठेवणार लक्ष

मात्र त्यानंतर 17 जून 2023 रोजी त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबच्या कबरीवर फुल अर्पण केली होती. त्यांच्या या कृतीवर बरीच टीका झाली होती. मात्र मी कबरीवर फुलं वाहिली, माझ्या निर्णयामुळे जी दंगल झाली असती ती थांबली, असं म्हणत त्यांनी त्यांच्या कृतीचे समर्थन केले होते. आता संभाजीराजे छत्रपती यांनी आपण वंचित बरोबर जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. प्रकाश आंबेडकरांना विद्वान समजतो मात्र औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहिल्याने माझं मन परिवर्तन झालं. ज्याने शिवाजी महाराजांना त्रास दिला, संभाजीराजेंची हत्या केली, त्याचं कुणी कसं कौतुक करू शकते? हे महाराष्ट्राचे संस्कार नाहीत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

मराठा आरक्षणावर अजित पवार यांना सबुरीचा सल्ला :

दरम्यान, यावेळी त्यांनी मराठा आरक्षण प्रश्नावर राज्य शासनाला सबुरीचा सल्ला दिला. ते म्हणाले, आज अजित पवार यांची भेट झाली. यात मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा झाली. गरीब मराठा समाजाला न्याय देण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत असे दादांनी सांगितले. मनोज जरांगे हे मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं अशी मागणी करत आहेत, पण ते न्यायालयात बसत असेल तरच तुम्ही त्याचा विचार करावा असे मी दादांना सांगितले. कारण मागच्यावेळी यावरून मराठा समाजातील 49 लोकांनी आत्महत्या केल्या होत्या, तसे काही घडू नये याची खबरदरी घ्यावी, असा सबुरीचा सल्ला संभाजीराजे यांनी दिला.

Operation Ajay : भारत सरकारचे मोठे यश; युद्धग्रस्त इस्त्रायलमधून 212 भारतीय सुखरूप मायदेशात

मनोज जरांगे यांच्या मागणीचा समितीने अभ्यास करून विचार करावा, न्यायालयात टिकणारे आरक्षण याबाबत विचार व्हावा. कारण पहिल्यांदा सामाजिक मागास सिद्ध होणे गरजेचे आहे. सामाजिक मागास सिद्ध झाल्यानंतर आरक्षण मिळू शकते. शिंदे समिती स्थापन झाली, शिंदे समिती जो अहवाल देईल तो महत्त्वाचा आहे. त्यावर सरकारने आपली दिशा ठरवावी, असेही संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले.

Tags

follow us