Operation Ajay : भारत सरकारचे मोठे यश; युद्धग्रस्त इस्त्रायलमधून 212 भारतीय सुखरूप मायदेशात
Operation Ajay : इस्रायलच्या भागात सुरक्षा कर्मचारी आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक (Israel Palestine Conflict) सुरूच आहे. इस्रायलच्या हवाई दलाने हमासच्या (Hamas) ताब्यात असलेल्या गाझामध्ये (Gaza) वेगाने हल्ले केले आहेत. युद्धात आतापर्यंत सुमारे तीन हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. हमासच्या अतिरेक्यांनी दक्षिण इस्त्रायलवर (Israel Attack) हल्ले करून मोठ्या प्रमाणात घुसखोरी केली आहे. हमासने समुद्र आणि हवेतून रॉकेट हल्ले केले. तसेच देशात घुसून अंदाधुंद गोळीबार केला. यात हजारो इस्त्रायली नागरिकांचा मृत्यू झाला. त्यानंतर इस्त्रायलनेही युद्ध घोषित केलं. इस्त्रायलनेही जशास तसे उत्तर देत हल्ले सुरू केले. या युद्धग्रस्त देशात भारतीय नागरिकही अडकून पडले आहेत. त्यांच्यासाठी भारत सरकारने मोठा निर्णय घेत ऑपरेशन अजय (Operation Ajay) सुरू केले. या मोहिमेंतर्गत 212 भारतीयांना सुखरुप मायदेशात आणण्यात आले.
Israel Palestine War : इस्त्रायलचं मोठं ऑपरेशन! 250 नागरिकांची सुटका, 60 अतिरेक्यांचा खात्मा
इस्त्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुखरुप मायदेशात आणण्यासाठी केंद्र सरकारने ऑपरेशन अजय (Operation Ajay) सुरू केले आहे. भारत सरकारकडून यासाठी खर्च करण्यात येत आहे. या विमानांतून आलेल्या भारतीयांना तिकीटाचे पैसे आकारलेले नाहीत.
युद्धग्रस्त इस्त्रायलमधून भारतात येण्यासाठी तेल अवीव शहरातील विमानतळावर मोठी गर्दी झाली आहे. इस्त्रायलमधून जे भारतीय परतत आहेत त्यात मोठी संख्या विद्यार्थ्यांची आहे. इस्त्रायलमध्ये शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याने सांगितले की युद्ध सुरू झालं तेव्हाच आम्ही सगळे घाबरलो होतो. मात्र, भारतीय दूतावासाने आम्हाला मदत केली. त्यामुळे आमच्याच हिंमत आली. त्यानंतर आज आम्हाला मायदेशात परत येता आलं याचा आनंद आहे.
Israel Palestine Conflict : इस्त्रायलमधील भारतीय सुखरुप घरी येणार; सरकारने सुरू केलं ‘ऑपरेशन अजय’