Israel Palestine War : इस्त्रायलचं मोठं ऑपरेशन! 250 नागरिकांची सुटका, 60 अतिरेक्यांचा खात्मा
Israel Palestine War : इस्त्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यातील युद्ध (Israel Palestine War) अजूनही सुरुच आहे. हमासच्या अतिरेक्यांनी इस्त्रायलमध्ये रॉकेट हल्ले करत युद्धाला सुरुवात करून दिली. त्यानंतर खवळलेल्या इस्त्रायलने सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. या युद्धात संपूर्ण गाझा पट्टी (Gaza) उद्धवस्त झाली आहे. आता इस्त्रायली सैन्याने हमासच्या (Hamas) अतिरेक्यांविरुद्ध केलेल्या कारवाईचा एक व्हिडिओ जारी केला आहे. यामध्ये इस्त्रायली संरक्षण दलाचे सैनिक एका कंपाऊंडमध्ये घुसून अतिरेक्यांनी ओलीस ठेवलेल्या नागरिकांची सुटका करत आहेत. या कारवाईत हमासचे जवळपास 60 दहशतवादी मारले गेल्याचे सांगण्यात येत आहे.
आयडीएफने दिलेल्या माहितीनुसार, येथील एका लष्करी चौकीवर ताबा मिळवण्याच्या प्रयत्नात गाझा सुरक्षा कुंपणाच्या आसपासच्या परिसरात फ्लोटिला 13 एलिट युनिट्स तैनात करण्यात आल्या होत्या. सैनिकांनी सुमारे 250 ओलिसांची सुटका केली. हमासच्या दक्षिण नेव्हल तुकडीच्या डेप्युटी कमांडरसह 60 पेक्षा जास्त अतिरेकी मारले गेले. तर 26 जणांना पकडण्यात आले.
इस्त्रायल (Israel) आणि हमास (Hamas) यांच्या संघर्ष सुरू आहे. आज पाच दिवस झाले तहीही हा संघर्ष अजून मिटला नाही. उलट दिवसेंदिवस हमास आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष तीव्र होत आहे. या संघर्षात अनेक देशांनी इस्रायलला पाठिंबा दिला आहे. गाझामध्ये मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेची हानी झाली आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अनेक देश इस्रायलच्या बाजूने आले आहेत.
Israel-Hamas War : ….तर इस्त्रायलाचाच सर्वनाश होईल; तुर्की राष्ट्राध्यक्षांचा इशारा
संरक्षण दलाने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकन शस्त्रांस्त्रांनी सज्ज विमान मंगळवार रात्री उशिर इस्त्रायलच्या नेबातिम हवाई तळावर पोहोचले. अमेरिकन लोकांनी पाठवलेली शस्त्रे त्यापैकी नौदलाची विमानवाहू युद्धनौका युएसएस गेराल्ड आर. फोर्ड. सपोर्ट एअरक्राफ्टचे 8 स्क्वॉड्रन आणि टिकॉन्डरोगा क्लास मार्गदर्शित क्षेपणास्त्र क्रूझर, क्षेपणास्त्र विध्वंसक यूएसएस थॉमस हडनर, यूएसएस रॅमेज, यूएसएस Carney आणि यूएसएस रुझवेल्ट यांचा समावेश होता.