Sudhakar Badgujar in BJP : ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी झाल्यानंतर ते कुठला निर्णय घेणार याची गेली आठवडाभर चर्चा सुरू होती. अखेर, बडगुजर यांनी या चर्चेला पुर्णविराम दिला आहे. (BJP) ते आज मंगळवार (दि. १७)रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबईच्या नरिमन पॉईंट येथील भाजप मुख्यालयात त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे.
या पक्षप्रवेशासाठी बडगुजर (Sudhakar Badgujar in BJP) आपल्या हजारो कार्यकर्त्यांना घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झाले. मात्र, आता त्यांच्या गाड्या अर्ध्या रस्त्यात असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गोंधळून टाकणारं विधान केलं आहे. सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाविषयी माझ्याकडं कोणतीही माहिती नसल्याचं बावनकुळे यांनी म्हटलं आहे. ते नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यामुळं नक्की काय सुरू आहे हे कळायला मार्ग नाही.
ठाकरेंनी हाकललेल्या बडगुजरांना होम ग्राऊंडवरचं विरोध; भाजप प्रवेश रखडणार?
सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल कुठलीही माहिती माझ्याकडं नाही. जोपर्यंत स्थानिक टीम असते, पदाधिकारी, खासदार आमदार त्यांच्याशी सल्लामसलत एकमत झाल्याशिवाय आमच्याकडं पक्षप्रवेश होत नाही. आमच्याकडं बडगुजरांच्या पक्षप्रवेशाला स्थानिक पदाधिकऱ्यांचा विरोध आहे. सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल मला कुठलीही माहिती नाही असंही बावनकुळे म्हणाले आहेत.
नाशिकचे स्थानिक पदाधिकाऱ्यांचा या पक्षप्रवेशाला विरोध आहे. निवडणुकीच्या राजकारणात जेव्हा आपण एकमेकांच्या विरोधात लढतो आणि आता निवडणुकीला फक्त सहा महिने झाले आहे. त्यामुळे विरोधाची भावना असते. परिणामी नाशिकमध्ये बडगुजर यांच्याविषयी विरोधाची भावना आहे, असंही बावनकुळे यांनी म्हटलंय. बावनकुळे यांच्या या वक्तव्यामुळे आज सुधाकर बडगुजर यांचा पक्षप्रवेश होणार की नाही, याबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.