Download App

कुंपणच शेत खातंय! पाथर्डीत नायब तहसीलदारच पुरवतोय मुलाला कॉपी…

पाथर्डी तालुक्यातील परीक्षा केंद्रावर तहसीलदाराला कॉफी पुरवताना रंगेहाथ पकडण्यात आले. अनिल तोरडमल असं या नायब तहसीलदाराचे नाव आहे.

  • Written By: Last Updated:

अहिल्यानगर – बारावीच्या विद्यार्थ्यांना कॉपी पुरवताना नायब तहसीलदाराला रंगेहाथ पकडण्यात आल्याची घटना अहिल्यानगरमध्ये (Ahilyanagar) घडली आहे. पाथर्डी तालुक्यातील परीक्षा केंद्रावर तहसीलदाराला कॉफी पुरवताना रंगेहाथ पकडण्यात आले. अनिल तोरडमल (Anil Toradmal) असं या नायब तहसीलदाराचे नाव असून ते बारावी पेपरमध्ये स्वतःच्याच मुलाला कॉपी पुरवत असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

घटना लपवली नाही पण…, स्वारगेट प्रकरणात गृहराज्यमंत्री योगेश कदमांचा पोलिसांना क्लीनचिट 

याबाबत अधिक माहिती अशी, यंदा बोर्डाच्या परीक्षा कॉपी मुक्त वातावरणामध्ये व्हाव्यात यासाठी प्रशासनाने देखील पुढाकार घेतला आहे. कॉपी मुक्त अभिनयासाठी कठोर नियमावली राबवली जात आहे. मात्र त्याची अंमलबजावणी करण्याऐवजी तहसीलदारानेच नियम धाब्यावर बसवले. तालुक्यातील एका शाळेवर खुद्द नायब तहसीलदार आपल्या पाल्याला कॉपी पुरवताना रंगेहाथ पकडल्याची घटना समोर आली.

परीक्षा केंद्रावर नेमक काय घडलं ?
राज्यात सध्या बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरु आहे. पाथर्डीमध्ये कॉपी प्रकार सर्वाधिक घडतात असा इतिहास आहे. यातच या तालुक्यात सुरू असलेल्या एका परीक्षा केंद्रावर हा प्रकार उघडकीस आला. नायब तहसीलदार हे मुलाला मदत म्हणून परीक्षा केंद्रावर पोहोचले. पेपर सुरु झाल्यानंतर त्यांनी मुलाला कॉपी देण्याचा प्रयत्न केला. परंतु, याचवेळी त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. तहसीलदार स्वत:च्याच मुलाला कॉपी पुरवत असल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

फिक्स्ड डिपॉझिट ते एलपीजी गॅस…1 मार्चपासून ‘हे’ मोठे बदल होणार, परिणाम थेट खिश्यावर 

तर संबंधित शाळेची मान्यता रद्द होणार
कॉपी मुक्त परीक्षेसाठी खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचना जारी केल्या आहेत. सामूहिक कॉपी करण्याचे प्रकार ज्या केंद्रावर उघडकीस येतील त्या केंद्राची मान्यता कायमस्वरूपी रद्द केली जावी. तसेच जे शिक्षक आणि कर्मचारी कॉपी करण्यासाठी मदत करतील त्यांना बडतर्फ करा, असे आदेश दिले आहेत. पण, आता आपल्या पाल्याला कॉपी पुरवतांना पकडल्या गेलेल्या नायब तहसीलदारावर काय कारवाई होणार, हेच पाहणं महत्वाचं आहे.

follow us