Ram Shinde : राज्यात नुकतेच विधानसभा निवडणुका या पार पडल्या व महायुतीचे सरकार अस्तित्वात आले. या निवडणुकीत कर्जत जामखेडचे महायुतीचे उमेदवार राम शिंदे (Ram Shinde) यांचा पराभव झाला मात्र शिंदे यांना पक्षाकडून एकनिष्ठेचे फळ मात्र मिळाले. शिंदे यांची विधानपरिषदेच्या सभापतिपदी वर्णी लागली. राज्यातील एक महत्त्वाचे संवैधानिक पद व नगर जिल्ह्याच्या अनुषंगाने त्याचे महत्त्व पाहता आमदार राम शिंदे यांचा नगर जिल्ह्यातील सर्वपक्षीयांच्यावतीने सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
येत्या शनिवारी (4 जानेवारी) सकाळी 10 वाजता नगर शहरातील माऊली संकुल याठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पद्मश्री पोपटराव पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील दोन्ही खासदार व सर्व लोकप्रतिनिधींसह पक्षाचे सर्व पदधिकारी व कार्यकर्ते उपस्थित असणार आहेत.
सभापती झाले पण विधानसभेच्या पराभवाची सल कायम; राम शिंदेंच पराभवावर मोठं वक्तव्य, म्हणाले
आमदार राम शिंदे यांचा सर्वपक्षीय भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महायुतीकडून भाजप व शिवसेनेचे पदधिकारी उपस्थित होते मात्र त्याचवेळी महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील केवळ काँग्रेसचे किरण काळे या बैठकीला उपस्थित होते. मात्र राष्ट्रवादीसह ठाकरेंच्या शिवसेनेने या निमंत्रणाकडे चक्क पाठ फिरवली. यावर बोलताना भाजपचे अॅड. अभय आगरकर म्हणाले आमच्याकडून सर्वांना निमंत्रित करण्यात आले आहे. आम्ही वारंवार सर्वांना फोन देखील केले असल्याचे आगरकर यांनी स्पष्ट केले.
विधानपरिषदेच्या सभापतिपदी शिंदे यांची बिनविरोध निवड झाली. नगर जिल्ह्याच्या भूमिपुत्राच्या या यशाबद्दल सर्व पक्षीयाच्यावतीने त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान या सत्कारासाठी सर्वपक्ष एकवटणार आहेत. मात्र अशीच परिस्थिती जिल्ह्याच्या विकासासाठी भविष्यात दिसणार का असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. दरम्यान या दृष्टीने पहिले पाऊल असल्याचे अभय आगरकर यांनी सांगितले.
राम शिंदेंना सभापतीपद देऊन फडणवीसांनी काय साधलं? जाणून घ्याच!