Download App

जिल्हा बंदी उठवलीच नाही? संदीप कोतकर पुन्हा अडचणीत, आणखी एक गुन्हा दाखल

विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असणाऱ्या संदीप कोतकरविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.  

Ahilyanagar News : विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच नगर शहरातून (Ahilyanagar News) एक मोठी बातमी समोर आली आहे. जामिनावर बाहेर आलेल्या आणि विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असणाऱ्या संदीप कोतकर यांच्यासह (Sandeep Kotkar) आणखी काही जणांविरुद्ध शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, संदीप कोतकर आणि त्याच्या कुटुंबीयांना एका खुनाच्या आरोपाखाली शिक्षा झाली होती. या शिक्षेला न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. सध्या संदीप कोतकरसह त्यांचे संपूर्ण कुटुंब जामिनावर बाहेर आहे. मात्र सचिन कोतकर वगळता इतर सर्वांवर उच्च न्यायालयाने जिल्हाबंदी घालण्यात आली होती. जिल्हाबंदीची अट शिथील करावी यासाठी न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता.

या अर्जावर सुनावणी होऊन न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. यावर पुन्हा 25 ऑक्टोबर रोजी सुनावणी ठेवण्यात आली होती. पंरतु, त्याचवेळी जिल्हा बंदीची अट शिथील झाल्याची चुकीची माहिती देऊन केडगावमध्ये संदीप कोतकर यांच्यासह समर्थकांनी जंगी मिरवणूक काढल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

माजी महापौर संदीप कोतकरांची जिल्हाबंदी उठवली, विधानसभेच्या रिंगणात उतरणार?

विशेष म्हणजे, सन २०१८ मध्ये खून झालेल्या शिवसैनिकांच्या घरासमोर फटाके फोडून आतषबाजी करण्यात आली. मयत शिवसैनिकांच्या कुटुंबियांना शिवीगाळ केल्याप्रकरणी आणि घरासमोर गोंधळ घातल्या प्रकरणी माजी महापौर संदीप कोतकर यांच्या विरोधात कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणुकीत उतरण्याच्या आधीच संदीप कोतकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

follow us