Ahilyanagar Politics : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या (Ajit Pawar) उपस्थितीत श्रीगोंद्यात शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले (Ahilyanagar Politics) आहे. मात्र या मेळाव्याच्या आयोजनावरून आता महायुतीमधील नेत्यांमध्ये शाब्दिक वार सोशल मीडियावर सुरू झाले आहे. एकमेकांच्या विरोधात रणशिंगे फुंकणारे पुन्हा स्वतःच्या फायद्यासाठी शेतकरी मेळाव्याच्या नावाखाली एकाच स्टेजवर अशा शब्दांत नागवडे व माजी आमदार राहुल जगताप यांच्यावर भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी हल्लाबोल केला आहे.
विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून विक्रम पाचपुते, शिवसेना ठाकरे गटाकडून राजेंद्र नागवडे तर अपक्ष म्हणून राहुल जगताप मैदानात होते. एकमेकांच्या विरोधात लढले व निवडणुकीत पाचपुते यांनी बाजी मारली व आमदार झाले. मात्र निवडणुकीनंतर काही दिवसांनी राजेंद्र नागवडे यांनी ठाकरे गटाला रामराम करत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश केला होता.
गुटखा विक्रीच्या हप्त्याचे कनेक्शन पाचपुते कुटुंबाशी! राहुल जगतापांचा आमदार पाचपुतेंवर निशाणा
तर दुसरीकडे शरद पवार यांच्यासोबत असलेले माजी आमदार राहुल जगताप यांनी देखील विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार गटात प्रवेश केला. नागवडे व जगताप यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी प्रवेश केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले. साखर कारखान्याच्या आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी दोघांनी प्रवेश केल्याच्या चर्चा झाल्या होत्या.
महायुतीमधील घटक पक्षामध्ये आल्यानंतर देखील परस्पर विरोधकांमध्ये शाब्दिक शीतयुद्ध सुरुच राहिले. काही दिवसांपूर्वी भेसळखोरी व अवैध धंद्यांवरून राहुल जगतापांनी विक्रम पाचपुतेंवर निशाणा साधला होता. आता अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये होणाऱ्या शेतकरी मेळाव्यापूर्वी पाचपुते यांनी आपल्या विरोधकांवर निशाणा साधला.
विधानसभेला स्वतःच्या फायद्यासाठी एकमेकांच्या विरोधात रणशिंग फुंकणारे आता पुन्हा स्वतःच्या फायद्यासाठी शेतकरी मेळाव्याच्या नावाखाली एकाच स्टेजवर. ये पब्लिक सब जानती है अशा शब्दांत आमदार विक्रम पाचपुते यांच्या सोशल मीडिया पेजवरून त्यांनी आपल्या विरोधकांना खोचक टोला लगावला आहे. त्यांच्या या टिकेवर आता जगताप आणि नागवडे काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
भेसळयुक्त पनीर प्रकरणी सरकारचं मोठं पाऊल; आमदार पाचपुतेंच्या लढ्याला यश