Download App

अजित पवारांवर कांद्याची माळ भिरकावण्याचा प्रयत्न, श्रीगोंद्यातील सभेत उडाला गोंधळ

आंदोलनकर्ता अजित पवारांना कांद्याच्या प्रश्नावर बोला असे म्हणत होता. परंतु, अजितदादांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करत भाषण सुरुच ठेवले.

Ajit Pawar News : शेतकरी मेळाव्याच्या कार्यक्रमानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज (Ajit Pawar News) श्रीगोंद्यात आले होते. यावेळी पवार यांचे भाषण सुरू असतानाच समोर उपस्थित असलेल्या एका युवकाने कांद्याची माळ अजित पवारांच्या दिशेने फेकण्याचा प्रयत्न केला मात्र उपस्थितांच्या हा प्रकार लक्षात आला त्यांनी हस्तक्षेप करत संबंधित युवकाचा प्रयत्न हाणून पाडला. या घटनेमुळे सभास्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. सुरक्षारक्षकांनी या युवकाला पकडून तेथून बाहेर काढून दिले. यावेळी आंदोलनकर्ता अजित पवारांना कांद्याच्या प्रश्नावर बोला असे म्हणत होता. परंतु, अजितदादांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करत भाषण सुरुच ठेवले. त्याचवेळी हा गोंधळ उडाल्याचे सांगितले जात आहे. सुरक्षारक्षकांनी संबंधित युवकाला तातडीने बाहेर काढून दिले.

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र नागवडे, माजी आमदार राहुल जगताप घनश्याम शेलार, राष्ट्रवादीचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, आमदार काशिनाथ दाते, आमदार संग्राम जगताप, मा.आ.रमेश थोरात, माजी आमदार लहू कानडे, चंद्रशेखर घुले, अरुण तनपुरे, संध्या सोनवणे, जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, पणन महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे, राज्य बाजार समिती सभापती बाळासाहेब नाहटा, अण्णासाहेब शेलार आदी उपस्थित होते.

अजित पवार पुढे म्हणाले, शेतकऱ्यांनी शेतात काम करताना आधुनिकतेची कास धरली पाहिजे. शेतात काम करताना उत्पादन वाढीसाठी AI सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. या तंत्रज्ञानासाठी सरकारने शेतकऱ्यांसाठी 500 कोटींची तरतूद केली आहे. सरकार वर्षाला तीन लाखांपर्यंत शून्य टक्के व्याजाने पीक कर्ज देत आहे. शेतकऱ्यांनी आर्थिक शिस्त लावली पाहिजे. कर्जाचे व्याज वेळेत भरले पाहिजे. सरकारने शेतकऱ्यांना दोनदा कर्जमाफी दिलेली आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी कमिटी नेमली आहे. आता योग्य वेळी कर्ज माफी करणार आहोत.

महायुतीत मिठाचा खडा! श्रीगोंद्यात अजितदादांच्या मेळाव्याआधीच आ. पाचपुते आक्रमक; जगताप-नागवडेंना घेरलं

जनतेच्या कल्याणासाठी अनेक योजना सुरू आहेत आणि पुढेही सुरू राहतील. 45 लाख शेतकऱ्यांना वीजबिल न भरता मोफत वीज योजना सुरू आहे. सरकार लाडक्या बहिणींसाठी महिन्याला 45 हजार कोटी रुपये खर्च करत आहे. भावाच्या नात्यानं लाडक्या बहिणींच्या कामासाठी निधी कमी पडू देणार नाही. शेतकऱ्यांना सोलर योजनेतून वीज देण्यासाठी 75 टक्के अनुदान आम्ही उपलब्ध करून देत आहोत.

डिंभे माणिकडोह बोगद्यासाठी आंबेगाव आणि श्रीगोंदा येथील लोकांत मतमतांतर आहेत मात्र चर्चेतून मार्ग निघेल. संत शेख महंमद महाराज मंदीर जिर्णोद्धारात अनेक अडथळे आल्याचे समजले. विचारांची लढाई विचारांनी करून मंदिर जीर्णोद्धारातील अडथळे दूर करा.अडचणी काढल्यानंतर मोठे मंदिर उभारण्यासाठी मदत करू. श्रीगोंद्यात विविध प्रश्नांसाठी सर्व जण एकत्र आले. समाजात काम करताना जातीय सलोखा राखला पाहिजे, भावनिकतेने प्रश्न सुटत नाही. आगामी निवडणुकांसाठी नव्या जुन्याची मोट बांधावी लागणार आहे.

आ.विक्रम पाचपुतेवर जगतापांची जोरदार टीका

श्रीगोंदा तालुक्यातील रस्त्यासाठी मोठा निधी उपलब्ध झाला आहे. बेलवंडी फाटा ते श्रीगोंदा या दिंडी पालखी 200 कोटीच्या रस्त्याच्या कामासाठी 20 टक्के कमिशन घेऊन निकृष्ट दर्जाच्या रस्त्याचे काम सुरू असल्याची टीका माजी आमदार राहुल जगताप यांनी करत तालुक्यातील रस्त्यांच्या कामांची चौकशी करावी. तसेच बनावट पनीर, गुटख्यासोबतच तालुक्यातील काष्टी येथे तयार होणाऱ्या बोगस दुधाची तसेच गुटख्यामध्ये हप्ता घेणाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी करत आ.विक्रम पाचपुते यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली.

गुटखा विक्रीच्या हप्त्याचे कनेक्शन पाचपुते कुटुंबाशी! राहुल जगतापांचा आमदार पाचपुतेंवर निशाणा

follow us