Download App

Ahmednagar Politics: जागांवरून रस्सीखेच ! शरद पवारांच्या जागांवर काँग्रेसचा डोळा; जिल्हाध्यक्षांचे प्रदेशाध्यक्षांना भेटून पत्र

काँग्रेसचे नगर जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन जागांची मागणी.

  • Written By: Last Updated:

Ahmednagar district president Jayant wagh letter to Nana Patole : लोकसभा निवडणुकीमध्ये (LokSabha Election) महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले आहे. नगर व शिर्डी दोन्ही जागा महाविकास आघाडीने खेचून आणल्या आहेत. आघाडीतील घटक पक्ष आता विधानसभेच्या तयारीला लागले आहे. आता नगर शहराच्या जागेवर आघाडीतील तिन्ही पक्षांनी दावा ठोकला आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार (Sharad Pawar) गटाकडे असलेल्या या जागेची मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आल्यानंतर आता काँग्रेसने देखील या जागेच्या दावा केलाय. काँग्रेसचे नगर जिल्हाध्यक्ष यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांची भेट घेत जिल्ह्यातील सात जागांवरती निवडणूक लढविण्याबाबत पटोले यांना पत्र दिले आहे. शरद पवारांचे लक्ष लागून असलेल्या नगर शहराच्या जागेवरती आता बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून काँग्रेस देखील चाचपणी करू लागले आहे.

मोठी बातमी : शिंदेंनी टीम इंडियासाठी खुली केली तिजोरी; जगज्जेत्या संघाला 11 कोटींचं बक्षीस जाहीर

लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात काँग्रेसला चांगले भरघोस यश मिळाले. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने 13 जागांवरती विजय मिळवत महाविकास आघाडीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचे दाखवून दिले. तर दुसरीकडे लोकसभेला झुकते माप घेणारे शरद पवारांची राष्ट्रवादी यांनी देखील आता विधानसभेमध्ये जास्त जागा लढवण्याचे स्पष्ट केले आहे. तर ठाकरे यांच्या सेनेला देखील लोकसभेत चांगले यश मिळाल्याने ठाकरे गटाकडून देखील नगर शहराच्या जागेवरती दावा केला जातो आहे.


फाईव्ह स्टार आश्रम, आलीशान गाड्या; हाथरसमधील भोले बाबांची संपत्ती तरी किती?

काँग्रेसचे नगर जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांनी मुंबई येथे जात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. जिल्ह्यातील बारा जागांपैकी सात जागा काँग्रेसला मिळावे, असे पत्र त्यांनी पटोले यांना दिले आहे. सद्यस्थितीला विचार केला असता अहमदनगर जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे दोनच आमदार आहेत. यामध्ये संगमनेर येथून बाळासाहेब थोरात, श्रीरामपूर येथून लहू कानडे हे दोन काँग्रेसचे आमदार आहेत.

मात्र लोकसभेमध्ये मिळालेले यश पाहता नगर जिल्ह्यातील सात जागांवरती दावा केला आहे. पत्रात म्हटले आहे की नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे अहमदनगर जिल्ह्यातील दोन्ही जागा महाविकास आघाडीने जिंकल्या. जिल्ह्यात लोकसभेच्या दोन जागा आहेत. शिर्डी शिवसेना त अहमदनगरची जागा राष्ट्रवादीकडे आहे. विधानसभेच्या एकूण 12 जागा आहेत. त्यापैकी आपल्या काँग्रेस पक्षाकडे संगमनेर, श्रीरामपूर व शिर्डी अशा केवळ तीनच जागा आहेत.

श्रीगोंदा, कोपरगाव, अकोले हे मतदारसंघही हवेत

आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाला आणखी चार जागा मिळणे गरजेचे आहे. यामध्ये श्रीगोंदा, नगर शहर, कोपरगाव व अकोले या जागा प्राधान्य क्रमाने घेणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील या सातही मतदारसंघात आपल्या पक्षाची खूप चांगली ताकद आहे. त्यामुळे या मतदारसंघातून आपल्या पक्षाचे उमेदवार नक्कीच विजयी होतील याची मी खात्री देतो तरी जिल्ह्यातील बारापैकी सात विधानसभा मतदारसंघ आपल्या पक्षाकडे घ्यावेत अशी मागणी यावेळी जयंत वाघ यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे केली आहे.

follow us