मोठी बातमी : शिंदेंनी टीम इंडियासाठी खुली केली तिजोरी; जगज्जेत्या संघाला 11 कोटींचं बक्षीस जाहीर

  • Written By: Published:
मोठी बातमी : शिंदेंनी टीम इंडियासाठी खुली केली तिजोरी; जगज्जेत्या संघाला 11 कोटींचं बक्षीस जाहीर

Team India Price Money : टी 20 विश्चषकाच्या अंतिम सामन्यात दक्षिण अफ्रिकेला पराभूत करत विश्चचषक पटकवणाऱ्या भारतीय संघासाठी महाराष्ट्र सरकारने तिजोरी खुली केली असून, राज्याचे मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जगज्जेत्या टीम इंडियासाठी 11 कोटींचं बक्षीस जाहीर (Team India Price Money) केलं आहे.

टी 20 विश्वचषक जिंकलेल्या टीम इंडियाच्या (Team India) मुंबईतील चार खेळाडूंचा आज विधानभवनात सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र सरकारडून या खेळाडूंचा विधिमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे यांचा सत्कार आणि गौरव करण्यात आला. य़ा वेळी मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जगज्जेत्या टीम इंडियासाठी 11 कोटींचं बक्षीस जाहीर केलं आहे.

आमच्याकडे डकवर्थ लुईसचा नियम आहे : फडणवीस

यावेळी फडणवीस बोलत होते. ते म्हणाले, आमच्याकडे डकवर्थ लुईसचा नियम आहे. कोण निवडून येईल, कोण सरकारमध्ये बसेल आणि अॅव्हरेजवर कोणाचा विजय होईल, हे सांगता येत नाही. मात्र, तरीही आम्ही एकत्र आहोत. कारण, आपला भारत जिंकला, अशा भावना फडणवीसांनी व्यक्त केल्यात.

एकही कॅच लिया लेकिन क्या कॅच लिया’ : एकनाथ शिंदे 

तर एकनाथ शिंदे म्हणाले, सामना पाहताना एकावेळी हा सामना आपल्या हातातून निसटला असं वाटत होतं मात्र भारतीय संघाने शानदार कामगिरी करत या सामन्यात विजय मिळवला आणि सूर्य कुमार यादवने त्या दिवशी एकही कॅच लिया लेकिन क्या कॅच लिया. सूर्य कुमारच्या त्या कॅचची आठवण आली तर डेव्हिड मिलर रात्री झोपेतून उठत असेल. 1983 च्या वर्ल्ड कॅप फायनलमध्ये देखील कपिल देव यांनी अशीच कॅच घेतली होती. त्या कॅच सारखा सूर्याचा हा कॅच देखील कोणी कधीच विसरू शकणार नाही.

तेव्हा मोदींनी फोन केल्यानंतरच माझं मन हलकं झालं; पंतने सांगितला ‘तो’ किस्सा…

भारतीय संघाने अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या टी-20 विश्वचषक 2024 मध्ये शानदार कामगिरी करत तब्बल 17 वर्षानंतर T20 विश्वचषक चॅम्पियन बनला आहे.  टी-20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने  दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करून विजेतेपद पटकावले होते. 4 जुलै रोजी भारतीय संघ मायदेशी परतला . त्यामुळे बीसीसीआयकडून वानखेडे स्टेडियमवर बीसीसीआयने भारतीय संघाचा सत्कार करण्यात आला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज