Kopargaon News : सहकारात अग्रेसर असणाऱ्या कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचा सन २०२४/२५ या वर्षाच्या ७० व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ येत्या मंगळवारी (दि.८) आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम मंगळवारी सकाळी १०.३० वाजता जेष्ठ संचालक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेत होणार आहे. कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कारखान्याचे उपाध्यक्ष शंकरराव चव्हाण व त्यांच्या पत्नी शकुंतला चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक सुनिल कोल्हे यांनी दिली आहे.
कारखाना व उद्योग समुहाचे संस्थापक माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या आदर्श विचारांवर तसेच कारखान्याचे जेष्ठ संचालक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार आशुतोष काळे यांनी साखर कारखान्याचे संपूर्ण नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. मागील वर्षी पूर्ण क्षमतेने संपूर्ण नव्या युनिटवर यशस्वी गाळप हंगाम घेऊन हा ऐतिहासिक गळीत हंगाम ठरला आहे. यापुढे देखील अनेक विक्रम नोंदले जाणार असून कारखान्यासह सर्व उद्योग समूह प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
गळीत हंगाम सुरु करण्याच्या दृष्टीने सर्व तयारी पूर्ण झाली आहे. कारखान्याच्या या ७० व्या गळीत हंगामाचा प्रारंभ बॉयलर अग्निप्रदीपन व विधिवत पूजा करून होणार आहे. या कार्यक्रमासाठी सर्व सभासद, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन साखर कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक सुनिल कोल्हे व कारखाना व्यवस्थापनाने केले आहे.
आशुतोष काळेंना मताधिक्यात नंबर एकवर नेऊ, अमृत संजीवनीच्या विद्यमान संचालकांची ग्वाही
कोपरगावच्या प्रत्येक खराब रस्त्यासाठी निधी मिळावा यासाठी आमदार काळे यांचा सततचा पाठ्पुरावा असल्यामुळे या पाठपुराव्यातून शहरातील विविध महत्वाच्या रस्त्यांना जिल्हा नियोजन समितीच्या जिल्हा वार्षिक योजनेतून 3.50 कोटींचा निधी मिळाला आहे.
यामध्ये कोपरगाव मतदार संघातील मौजे वारी-बापतरा (इजिमा 01) या रस्त्यासाठी 50 लक्ष, सावळगाव राधु पाटील उकिरडे घर ते राजेंद्र वाळूंज घर रस्ता करणे 50 लक्ष व कोकमठाण येथील इंटरनॅशनल स्कूल ते प्र.रा.मा.08 ला मिळणाऱ्या रस्त्यासाठी 50 लक्ष, एमडीआर 08 ते बक्तरपूर गावापर्यंत रस्ता करणे 40 लक्ष, ओगदी ते उंदीरवाडी तालुका हद्द रस्ता (ग्रा.मा.70) 40 लक्ष, काळे वस्ती ते कोळपेवाडी रस्ता (ग्रा.मा.21) 40 लक्ष, मनेगाव ते तळेगाव रस्ता (ग्रा.मा.63 ) 40 लक्ष, कोकमठाण ते माळवाडी प्ररामा 08 ला जोडणारा रस्ता (ग्रा.मा.68) 40 लक्ष, असा एकूण 3.50 कोटीच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.