‘आशुतोष काळेंना मताधिक्यात नंबर एकवर नेऊ’, अमृत संजीवनीच्या विद्यमान संचालकांची ग्वाही

‘आशुतोष काळेंना मताधिक्यात नंबर एकवर नेऊ’, अमृत संजीवनीच्या विद्यमान संचालकांची ग्वाही

Kopargaon News: कोपरगाव तालुक्याच्या इतिहासात एकाच पंचवार्षिकमध्ये 3 हजार कोटींचा निधी (Kopargaon News) आजपर्यंत एकाही लोकप्रतिनिधीला आणता आला नाही. तरी देखील संवत्सरला विकासकामांसाठी एकाच पंचवार्षिक मध्ये 41 कोटीचा निधी आजपर्यंत मिळालेला नाही. मागील विधानसभा निवडणुकीत संवत्सरमध्ये जरी आमदार आशुतोष काळेंना (Ashutosh Kale) विरोधकांपेक्षा कमी मताधिक्य असेल. परंतु यावर्षी या मताधिक्यात त्यांनी केलेल्या विकासकामांच्या जोरावर (Kopargaon Assembly Constituency) आम्ही काळेंना संवत्सरमध्ये मताधिक्यात नंबर एकवर नेवू, अशी ग्वाही कोल्हे गटाच्या अमृत संजीवनी शुगर केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे विद्यमान संचालक कचेश्वर रानोडे यांनी दिली आहे.

संवत्सर येथे कोल्हे गटाच्या अनेक कार्यकर्त्यांनी आमदार आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. यामध्ये कोल्हेंचे विश्वासू सहकारी अमृत संजीवनी शुगर केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे विद्यमान संचालक कचेश्वर रानोडे यांच्यासह संवत्सर येथील संदीप रानोडे, राहुल रानोडे, सयाजीराव रानोडे, ज्ञानेश्वर रानोडे, बाबासाहेब मगर, छायाबाई आचारी, सुरेश रानोडे, चंद्रकांत कडलग, रामदास सौदागर, इकबाल शेख, रामभाऊ पवार, अनिल शिंदे, अशोकराव जगताप, कुंदन परजणे, जगन्नाथ आचारी, शुभम परजणे, भाऊसाहेब महाले आदी कार्यकर्त्यांचा सामावेश आहे.

कचेश्वर रानोडे यांनी यावेळी आमदार आशुतोष काळे यांना सांगितले की, या 5 वर्षात झालेला विकास आजपर्यंत कधीही झाला नाही. तसेच झालेल्या विकासाचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मतदार संघातील नागरिकांना फायदा झाला असून रस्ते नागरिकांच्या दारापर्यंत आले आहेत, हे नाकारून चालणार नाही. त्यामुळे माझ्यासह अनेक नागरिकांनी राष्ट्रवादीत कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला असून यापुढेही असंख्य नागरिक प्रवेश करणार आहेत. त्यामुळे संवत्सरमध्ये ज्या- ज्या भागात मागील वेळी मताधिक्य कमी होते. त्या भागात देखील झालेल्या विकासकामांवर मते मागून आमदार काळेंना येत्या विधानसभा निवडणुकीत मताधिक्यात नंबर एकवर नेवून मोठे मताधिक्य मिळवून देणार असल्याचे संचालक कचेश्वर रानोडे यांनी सांगितले.

आमदार काळेंचा यशस्वी पाठपुरावा; पोहेगाव ग्रामीण रुग्णालयास सरकारची मंजुरी

यावेळी सर्वांचा आमदार आशुतोष काळे यांनी सत्कार केला.ते म्हणाले की, सातत्याने विरोधी पक्षातील दिग्गज कार्यकर्ते राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करीत आहेत. दोन दिवसापूर्वी करंजी येथील संदिप शिंदे, केशव शिंदे, विकास शिंदे, खिर्डी गणेश येथील रामदास रोहोम, आप्पासाहेब रोहोम, सुमित चांदर, सिद्धार्थ थोरात, चंद्रकांत बागुल, विलास लोखंडे आदी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश प्रवेश केला. त्यामुळे यापुढील काळात विकास करण्यासाठी बळ मिळणार आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube