Ahmednagar News : हजारोंच्या उपस्थितीत राहुरीत हिंदू जनआक्रोश मोर्चाचा ‘आवाज’ घुमला!
Ahmednagar : जिल्ह्यात सध्या ‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतर अशी प्रकरणे चांगली गाजू लागली आहे. यातच हे प्रकरण थेट अधिवेशनात उपस्थित झाल्याने यावरून राजकारण देखील तापू लागले आहे. दरम्यान याच दोन मुद्द्यांवरून आज राहुरीमध्ये हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. भाजप आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वात या मोर्चाला सुरुवात झाली आहे. या मोर्चामध्ये भाजप खासदार सुजय विखे, नगर जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डीले, अक्षय कर्डिले, यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले आहेत.
गोऱ्हेंची खुर्ची वर्षभरासाठी सेफ! अधिवेशनात शेवटच्या दिवशी भाजपचा मास्टरस्ट्रोक; ठाकरे गट बुचकळ्यात
जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अक्षरशः धोक्यात आली आहे. सातत्याने खून, दरोडे, हत्याकांड या घटना सुरु असताना यातच भर म्हणून लव्ह जिहाद तसेच धर्मांतराच्या घटनांमध्ये देखील वाढ होऊ लागली आहे. नुकतेच राहुरी तालुक्यातील उंबरे या गावात घडलेल्या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली होती. या घटनांना कोठीतरी आळा बसावा यासाठी सरकारने
‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतरण विरोधात कठोर कायदा करावा. याच महत्वाच्या मागणीसाठी आज शनिवारी सकाळी राहुरीच्या वायएमसीए ग्राउंडवरून हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. भाजप आमदार नितेश राणे यांच्यासह खासदार सुजय विखे देखील उपस्थित आहेत. यावेळी मोर्चा दरम्यान जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या.
D2M : इंटरनेटशिवाय मोबाईलवर दिसणार TV; मोदी सरकारने बनवली खास योजना
पोलीस प्रशासन सज्ज
राहुरीमधील घटनेवरून जिल्ह्यात मोठा तणाव देखील निर्माण झाला होता. यातच हिंदू समाजाच्या वतीने जनआक्रोश मोर्चाचे देखील काढण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर राहुरीमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मोर्चाच्या एक दिवस आधी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी मोर्चा मार्गाची पाहणी देखील केली होती.