Sujay Vikhe On Jayant Patil : अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुजय विखे पाटील(Sujay Vikhe) यांच्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil)यांनी जोरदार टीका केली होती. विखे हे पाच वर्षांत मतदारसंघात फिरलेच नाही, तसेच जनसंपर्क नसलेले खासदार अशी घणाघाती टीका जयंत पाटील यांनी सुजय विखे यांच्यावर केली होती. त्यावर खासदार सुजय विखे यांनी जयंत पाटील यांच्यावर पलटवार केला आहे. जी माणसं आपल्या जिल्ह्यातलेच नाहीत, त्यांच्यावर मी काय बोलायचं? अशा शब्दात खासदार विखे यांनी जयंत पाटलांना प्रत्युत्तर दिले आहे. उमेदवारीसाठी इच्छुक असलेले राम शिंदे (Ram Shinde)यांनी देखील मनाचा मोठेपणा दाखवल्याने विखे यांनी शिंदे यांचे यावेळी आभार मानले.
Maylek चित्रपटाचे नवीन पोस्टर झळकले; उमेश कामतचीही महत्वाची भूमिका
नगर दक्षिण लोकसभेच्या पार्श्वभूमीवर भाजप पदाधिकाऱ्यांची आज जामखेड येथे महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला प्रामुख्याने महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांच्यासह विधान परिषदेचे आमदार राम शिंदे तसेच भाजपाचे कार्यकर्ते व पदाधिकारी हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवसेनेच्या उमेदवारासाठी PM मोदींची महाराष्ट्रात पहिली सभा… विदर्भातून फुंकणार प्रचाराचे रणशिंग
दरम्यान भाजपकडून आमदार राम शिंदे हे देखील लोकसभेसाठी इच्छुक होते मात्र पक्षाकडून सुजय विखे यांना उमेदवारी ही जाहीर झाली. त्यानंतर शिंदे हे नाराज असल्याचे चर्चा देखील समोर आल्या होत्या. देखील एका कार्यक्रमाद्वारे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींची देखील माफी मागितली होती. त्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे यांनी देखील मंत्री राम शिंदे यांची भेट घेत शिंदे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता.
महाविकास आघाडीकडून उमेदवार असलेले निलेश लंके यांच्या जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे नगरला होते. यावेळी त्यांनी खासदार सुजय विखे यांच्यावरती टीका केली होती. खासदार विखे हे गेले पाच वर्षे दिसले नाहीत तसेच ते लोकांशी संपर्क साधत नव्हते, असा आरोपही लंके यांनी केला होता.
या आरोपावर सुजय विखे म्हणाले की, जी व्यक्ती जिल्ह्यातलीच नाही त्यांच्या प्रश्नाला काय उत्तर द्यायचं? असा शाब्दिक टोला यावेळी विखे यांनी लगावला. तसेच यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं आम्ही आमच्या सभेतून देऊ, असं देखील यावेळी विखे म्हणाले. अजून आमच्या सभा सुरु झालेल्या नाहीत तसेच येणाऱ्या सभांमधून आम्ही त्यांच्या टीकेला उत्तर, देऊ असंही यावेळी विखे म्हणाले.
लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने सोशल मीडियावर देखील पोस्ट सुरु झाल्या आहेत. यावर विखे म्हणाले की, मी सोशल मीडिया वापरतच नाही, त्यामुळं त्याच्याव काय चालू आहे? तसंच खाली कार्यकर्त्यांमध्ये काय स्पर्धा आहे? याबाबत कार्यकर्त्यांशी देखील संवाद साधतो, असंही खासदार विखे म्हणाले.