Download App

निलेश लंकेंची यांची रोज नवीन गुगली, पवारांशी बोलणे नाही…पण त्यांनाच विचारणार

Ahmednagar News : लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election) बिगुल वाजला असून नगर जिल्ह्यात देखील राजकीय हालचालींना वेग प्राप्त झाला आहे. यातच नगर दक्षिणेतून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातून आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) हे लोकसभा लढवणार अशी चर्चा आहे. यातच अजित पवार गटात असलेले लंके यांनी आमदारकीचा राजीनामा देणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या यावर आता लंके यांनी वक्तव्य केले आहे. राजीनाम्याबाबत मलाच माहित नाही. मात्र सध्या राजीनाम्याबाबतच्या चुकीच्या गोष्टी पसरविल्या जात आहे. येत्या काळात योग्य तो निर्णय घेतला जाईल असे सूचक विधान देखील यावेळी आमदार निलेश लंके यांनी केले.

विजय शिवतारे यांचे बंड शमले : अजितदादा यांच्या शेजारी उभे राहून खळखळून हसले

शिवजयंती उत्सवाचे नगर शहरात ठिकठिकाणी आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने आज लंके यांनी विविध ठिकाणी भेटीगाठी दिल्या. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून लोकसभेची तयारी करत असलेल्या निलेश लंके यांच्या उमेदवारीबाबत तर्क वितर्क लावले जात आहे. तसेच माविआच्या बैठकांना लंके हे हजेरी लावत असल्याने लवकरच त्यांचा शरद पवार गटात प्रवेश होईल अशी चर्चा देखील आहे. याच दरम्यान लंके यांनी आमदारकीचा राजीनामा देणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. तसेच येत्या काही दिवसांमध्ये ते शरद पवार गटात प्रवेश करत नगर दक्षिणेमधून लोकसभेची तुतारी फुंकणार अशी चर्चा होती. यावर आता खुद्द लंके यांनी महत्वाचे वक्तव्य केले आहे.

लंके म्हणाले, मला फोन आले कि तुम्ही राईजनामा द्यायला चालले आहे का? मात्र मी मतदार संघामध्ये फिरतोय. अशा चुकीच्या गोष्टी सध्या पसरविल्या जात असल्याचा आरोप देखील यावेळी लंके यांनी केला. तसेच लोकसभेसाठी उमेदवार देखील दुसराच आहे असे देखील वृत्तपत्रात वाचण्यात आले. मात्र वेळ काळ पाहता येत्या काही दिवसांमध्ये निर्णय घेऊ असे सूचक वक्तव्य लंके यांनी केले. लंके यांच्या या वक्तव्यामुळे येणाऱ्या काळात शरद पवार गटाकडून लोकसभेसाठी लंके यांनी पूर्णपणे तयारी केली असल्याचे देखील स्पष्ट होत आहे.

तिकडे उमेदवारीची घोषणा अन् इकडे ईडीची नोटीस : अमोल कीर्तीकर, दिनेश बोभाटेंना चौकशीसाठी बोलावणे

लंकेकडून माविआच्या नेत्यांच्या भेटीगाठी
शिवजयंतीचे नगर शहरात आयोजन करण्यात आले होते. यावेळी लंके यांनी ठिकठिकाणी हजेरी लावली यावेळी त्यांच्यासमवेत नगर शहरातील माविआचे नेते तसेच पदाधिकारी हे मंचावर आढळून आले. तसेच यावेळी लंके हे मविआच्या पदाधिकाऱ्यांसमवेत नगर शहरातून मोटार सायकलवर देखील फिरले. यामुळे लंकेंनी येणाऱ्या लोकसभा पाहता माविआच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्याचे सत्र देखील वाढवले आहे.

माझं शरद पवारांशी बोलणं झालं नाही….
राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून नगर दक्षिण लोकसभेसाठी लंके यांचे नाव चर्चेत आहे. यावर लंके म्हणाले, माझी या अनुषंगाने शरद पवार तसेच माविआच्या नेत्यांशी कोणतीही चर्चा झालेली नाही आहे . मात्र याबाबत पवारांशी बोलून योग्य तो निर्णय घेतला जाईल असेही लंके म्हणाले.

follow us