प्रविण सुरवसे -विशेष प्रतिनिधी
Ahmednagar News : राज्यात आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी (assembly election) आता राजकीय पक्षांकडून योग्य उमेदवाराची चाचपणी सुरू झाली आहे. यातच इच्छुक उमेदवारांकडून निवडणुकांच्या अनुषंगाने भेटीगाठी घेणे वरिष्ठांच्या संपर्कात राहणे आदी गोष्टी देखील सुरूच आहे. यातच गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यात झालेल्या विवीध राजकीय घडामोडी असो पक्ष फुटी असो वा सत्ताबदल यामुळे अनेक ठिकाणी राजकीय गणित ही बिघडली आहे.
Ahmenagar Crime : कॉफी शॉपच्या भलतच काहीतरी… कपल्स आढळले नको त्या अवस्थेत!
नगर जिल्ह्यात (Ahmednagar News) देखील या बदलाचे परिणाम दिसून येऊ लागले आहे. जिल्ह्यातील श्रीगोंद्यात राजकीय पक्षांकडून आगामी विधानसभेची तयारी सुरु आहे मात्र आता श्रीगोंद्यात उमेदवारीवरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी निर्माण होण्याची शक्यात निर्माण झाली आहे. दुसरीकडे भाजप कोणाला संधी देणार हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे. महाविकास आघाडीला श्रीगोंद्यातून खिंडार पडणार का ? तसेच नेमके कोण आहे दावेदार व पक्षांकडून कोण ठरणार विधानसभेचे शिलेदार हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ…
पाचपुते – जगतापांपुढे नागवडेंचे आव्हान
2014 चा अपवाद वगळता श्रीगोंदा विधानसभेचे प्रतिनिधित्व ज्येष्ठ नेते बबनराव पाचपुते यांनी केले आहे. शरद पवार हेच माझे विठ्ठल म्हणणाऱ्या पाचपुते 2019 ला भाजप कडून आमदार झाले. 2014 विधानसभेला भाजपात गेलेल्या पाचपुतेंचा राष्ट्रवादीचे राहुल जगताप यांनी धक्कादायक पराभव केला. राहुल जगतापांच्या विजयात काँग्रेसचे दिवंगत शिवाजी नागवडे यांचा मोठा हातभार राहिला तो शरद पवार यांच्यामुळे. मात्र आता आ.पाचपुते, माजी आ.राहुल जगताप यांच्या समोर काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा अनुराधा नागवडे यांनी विधानसभा निवडणूक लढवणारच असे घोषित केल्याने महाविकास आघाडीसमोर उमेदवारीचा पेच निर्माण झाला आहे.
Kiran Mane : पक्ष प्रवेशानंतर किरण मानेंनी थेटच सांगितलं; म्हणाले, ‘परिवर्तनाच्या लढाईत… ‘
भाजपचे पत्ते गुलदस्त्यातच
काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा असलेल्या अनुराधा नागवडे यांचे पती राजेंद्र नागवडे हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत. एकाच घरात काँग्रेस पक्षाचे दोन्ही जिल्हाध्यक्ष पद असताना नागवडे दांपत्य काँग्रेस कडून उमेदवारी न मिळाल्यास बंडाच्या तयारीत आहे. या परस्थितीत भाजपचे विद्यमान आमदार बबनराव पाचपुते हे तब्येतीच्या कारणास्तव आपले पुत्र विक्रम पाचपुते किंवा पत्नी प्रतिभा पाचपुते यांच्यासाठी आग्रही असल्याची चर्चा आहे. गेली पन्नासवर्षं राजकारणात असून मतदारसंघात कोट्यवधींची कामे केली असल्याने भाजप कडून पुन्हा उमेदवारी मिळेल असा विश्वास देखील बबनराव पाचपुते यांनी व्यक्त केला आहे.
महाविकास आघाडीला खिंडार पडणार?
काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष असलेल्या अनुराधा नागवडे यांनी विधानसभा निवडणूक लढवणारच असे घोषित केले आहे. श्रीगोंदयाची जागा महाविकास आघाडीत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे असून माजी आमदार राहुल जगताप यांनी निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केली आहे. अशात काँग्रेस कडून नागवडे परिवारात जेष्ठनेते बाळासाहेब थोरात कॉग्रेस कडे जागा खेचून आणणार का हा मोठा प्रश्न आहे. मात्र नागवडे यांना काँग्रेस कडून उमेदवारी धूसर वाटत असल्याने अनुराधा नागवडे यांनी वेळ आल्यास अपक्ष किंवा इतर पर्याय निवडू पण विधानसभा लढवणारच असे स्पष्ट केले आहे.
नागवडेंसमोर ‘हा’ पक्ष ठरू शकतो पर्याय
विशेष म्हणजे येत्या 19 जानेवारी रोजी माजी आमदार दिवंगत शिवाजी बापू नागवडे यांचा जयंती कार्यक्रम उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे. अजित दादा स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. यामुळे या भेटीदरम्यान काही राजकीय घडामोडी घडणार का हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे. तसेच तिकीट न मिळाल्यास वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत असलेल्या नागवडेंच्या समोर असलेल्या पर्यायातला राष्ट्रवादी अजित पवार गट हा देखील एक पर्याय ठरू शकतो असे बोलले जात आहे. मात्र कोणाला संधी मिळणार हे येत्या काळातच स्पष्ट होईल.