Download App

ह्रदयद्रावक! सुतक फेडणं जीवघेणं ठरलं; बहिणीसह दोन भावांनाही जलसमाधी

Ahmednagar : घरातल्या वृद्ध व्यक्तीचं सुतक फेडणं एका कुटुंबासाठी जीवघेणंच ठरल्याची घटना अहमदनगरमध्ये घडली. एकाच कुटुबांतीली बहीणीसह दोन भावांचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. बहीणीसह दोन्ही भावं घरातल्या व्यक्तीचं सुतक फेडण्यासाठी आईसोबत आंतरवली फाटा इथल्या पाझर तलावावर गेले होते. यावेळी ही घटना घडलीयं.

Mahatransco Recruitment : इंजिनिअर्संसाठी खुशखबर! राज्य विद्युत पारेषण कंपनीत बंपर भरती, ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

नेमकं काय घडलं?

दीपक ज्ञानेश्वर सुरवसे,(16) सानिया ज्ञानेश्वर सुरवसे(14) व कृष्णा परमेश्वर सुरवसे(16) अशी बुडून मृत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत. काही दिवसांपूर्वीच सुरवसे कुटुंबातील एका वृद्ध व्यक्तीचं निधन झालं होतं. त्यानंतर घरातील सुतक काढण्यासाठी कपडे धुण्यासाठी सुरवसे कुटुंब पाझर तलावावर गेले होते. यावेळी आईसोबत दीपक, सानिया, कृष्णा हे तिघेही गेले होते.

Leo Trailer: थलपती विजयची क्रेझ, लिओ’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित

एकीकडे पाझर तलावानजीक आई कपडे धुत असताना दुसरीकडे तिघेही खेळत होती. अचानक सानिया सुरवसेचा पाय घसरुन तलावात पडली. तिला पोहता येत नसल्याने ती पाण्यात बुडत होती. बहीण पाण्यात बुडत असल्याचं दिसताच दोन्ही भावांनी पाण्यात उडी घेत तिला वाचवण्याचा प्रयत्न केला.

अजितदादांच्या मुख्यमंत्रिपदाबद्दल सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, म्हणाल्या दादा मुख्यमंत्री झाले तर…

मात्र, दोघांनाही पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाले आहेत. दरम्यान, तिघेही पाण्यात बुडत असताना आईने त्यांना पाण्यात उतरुन वाचवण्याच प्रयत्न केला मात्र, त्याही पाण्यात बुडू लागल्याने इतर ग्रामस्थांनी त्यांना वाचवले.

Nanded Hospitals death: आतापर्यंत झालेले ४१ मृत्यू हे सरकारने केलेले खूनच; वडेट्टीवारांचा आरोप

या घटनेनंतर गावातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पाण्यात तिघांचाही शोध घेतला. तिघेही बेशुद्ध अवस्थेत पाण्यात आढळून आले. तिघांनाही रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले मात्र त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. या घटनेमुळे सुरवसे कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला असून सर्वत्र शोककळा पसरली.

दरम्यान, ही घटना घडल्यानंतर खर्डा गावचे माजी उपसरपंच भागत सुरवसे, बाबासाहेब डोके, विशाल मुरकुटे यांनी योगेश सुरवसे, लखन नन्नवरे, बिबीशन चौगुले, मयुर डोके धाव घेऊन बुडालेल्या मुलांना पाण्यातून बाहेर काढले होते.

follow us