Mahatransco Recruitment : इंजिनिअर्संसाठी खुशखबर! राज्य विद्युत पारेषण कंपनीत बंपर भरती, ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

Mahatransco Recruitment 2023 : महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड (Maharashtra State Electricity Transmission Company Limited) मध्ये नोकरी करण्याची एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. कारण या विद्युत कंपनीने विविध पदांसाठी भरती करणार आहे. या भरतीअंतर्गत कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता आणि सहायक अभियंता या पदांसाठी एकूण 598 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, नोकरीचे ठिकाण आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख याबद्दल तपशीलवार माहिती नोटिफिकेशनमध्ये दिली आहे.
NCP News : राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह कुणाचं? शरद पवार की अजितदादांचं? आज महत्वाची सुनावणी
या पदासाठी अर्ज करताना उमेदवारांनी , 10वी, 12वी व शैक्षणिक प्रमाणपत्रे, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखीचा पुरावा (आधार कार्ड, परवाना) आणि पासपोर्ट आकाराचे पफोटो सादर करणं आवश्यक आहे. या पद भरतीसाठी मागास प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी निकषांनुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.
शैक्षणिक पात्रता –
कार्यकारी अभियंता (पारेषण): इलेक्ट्रिकल विषयातील अभियांत्रिकी पदवी + 9 वर्षांचा अनुभव किंवा अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून 2 वर्षांचा अनुभव.
अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण): इलेक्ट्रिकल विषयातील अभियांत्रिकी पदवी + 7 वर्षांचा अनुभव किंवा उप कार्यकारी अभियंता म्हणून 2 वर्षांचा अनुभव.
उप कार्यकारी अभियंता (पारेषण): इलेक्ट्रिकलमधील अभियांत्रिकी पदवी + 3 वर्षांचा अनुभव.
सहाय्यक अभियंता (पारेषण): इलेक्ट्रिकलमधील अभियांत्रिकी पदवी.
सहाय्यक अभियंता (दूरसंचार): इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार मध्ये अभियांत्रिकी पदवी.
वयोमर्यादा-
खुला प्रवर्ग – वयोमर्यादेसाठी जाहिरात पहा.
मागासवर्ग – 5 वर्षे.
अर्ज शुल्क –
खुली श्रेणी – 700 रु.
मागासवर्गीय- 350 रु.
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्रात.
अधिकृत वेबसाइट – https://www.mahatransco.in/
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक –
https://ibpsonline.ibps.in/msetclaug23/
ऑनलाइन अर्जाची सुरुवात – 4 ऑक्टोबर 2023
ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख – 24 ऑक्टोबर 2023
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक – https://ibpsonline.ibps.in/msetclaug23/
जाहिरात –
कार्यकारी अभियंता –
https://drive.google.com/file/d/1sIcrnZnEfqN1Kg3NWuPS2kGgT7WJpNW1/view
अतिरिक्त कार्यकारी अभियंता –
https://drive.google.com/file/d/1s-Lud3TDKL2llei4VbCMSuSALwGG0DUX/view
उप कार्यकारी अभियंता –
https://drive.google.com/file/d/1of9n_K-zLiN_8x7svmMg6PJRQJBkw4dl/view
सहाय्यक अभियंता –
https://drive.google.com/file/d/1bwAiUP_r1i8qB2ABrFLsTdVYyZRuB6Hm/view