Download App

वारसा दिवाळी अंकाच्या माध्यमातून जिल्ह्यातील साहित्यिकांना संधी मिळतेयं; नरेंद्र फिरोदिया

Ahmednagar News : वारसा दिवाळी अंकाच्या माध्यमातून जिल्ह्यातील साहित्यिकांना संधी मिळत असल्याचं प्रतिपादन उद्योजक नरेंद्र फिरोदिया(Narendra Firodia) यांनी केलं आहे. शांती कुमार फिरोदिया मेमोरियल फाउंडेशनच्यावतीने प्रकाशित झालेल्या वारसा दिवाळी अंकाचा प्रकाशन सोहळा आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते.

म.सा.प. सावेडी उपनगर व शांती कुमार फिरोदिया मेमोरियल फाउंडेशनच्यावतीने प्रकाशित झालेल्या वारसा दिवाळी अंकाचा प्रकाशन सोहळा आमदार संग्राम जगताप यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी म.सा. प. सावेडी शाखेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया होतें. यावेळी प्राचार्य डॉ.अनिल सहस्रबुद्धे, प्रा. मेधाताई काळे, ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे यांची उपस्थिती होती.

…म्हणून ऋषी सुनक यांनी भारतीय वंशांच्या नेत्याला पदावरुन हटवलं; कारण आलं समोर

यावेळी बोलताना फिरोदिया म्हणाले, वारसा दिवाळी अंकास राज्यातील लेखकांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे. अल्पावधीत अंक वाचकप्रिय ठरला असून जिल्ह्यातील साहित्यिकांना याद्वारे संधी मिळते आहे ही आनंदाची बाब आहे. भविष्यात विविध साहित्य उपक्रमां बरोबरच सावेडी उपनगर शाखा व शांती कुमार फिरोदिया मेमोरियल फाउंडेशनच्या वतीने लवकरच जिल्ह्यातील साहित्यिकांना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करणारं असल्याचं फिरोदिया यांनी स्पष्ट केलं आहे.

तसेच ऐतिहासिक वारसा लाभलेल्या अहमदनगर जिल्ह्याला मोठी साहित्य परंपरा लाभली असून यातुन अनेक प्रतिभावान साहित्यिक देशाला मिळाले असून हा प्रगल्भ वारसा खऱ्या अर्थाने जोपासण्याचे काम महाराष्ट्र साहित्य परिषदेची सावेडी उपनगर शाखा करीत आहे. यामुळे जिल्ह्याला वैचारिक समृद्धी लाभली असून साहित्यिकांना आपले विचार वारसा दिवाळी अंकातून व्यक्त करता आले, असे प्रतिपादन आमदार संग्राम भैय्या जगताप यांनी केले.

बीडमध्ये ऐन दिवाळीत पोलिसांची मोठी कारवाई: तब्बल 181 जणांना बेड्या; 200 जण रडारवर

आ. जगताप बोलताना पुढे म्हणाले की, कोणत्याही शहरांच्या सांस्कृतीक जडणघडणीमधे साहित्यिकांचे मोठें योगदान असतें. आपल्या साहित्य कृतीतून ते विधायक विचार देतं असतात. यातुन शहराची संस्कृती जपली जाऊन समाजाला दिशा मिळत असते. शहराची वाचन संस्कृती जोपासण्याच्या दृष्टीने माहापलिकेच्या माध्यमातुन शहराला शोभेल असे राष्ट्रीय दर्जाचे मोठें वाचनालय निर्माण करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून लवकरच या कामाला सुरुवात होईल.

प्रीतम मुंडेंना शह देण्यासाठी भाजपची खेळी? सुरेश कुटे बीड लोकसभा लढविणार असल्याची चर्चा

दरम्यान, प्रास्तविक करतांना अंकाचे कार्यकारी संपादक जयंत येलुलकर म्हणाले की, वारसा दिवाळी अंकाने दर्जेदार साहित्य निर्मिती करतांना राज्यात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. नरेंद्र फिरोदिया यांच्या मार्गदर्शनामुळे ही कौतुकास्पद कामगिरी करणे शक्य झाले. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे वारसा दिवाळी अंकांची विशेष दखल घेते हा अहमदनगर जिल्ह्याचा गौरव आहे.

Tags

follow us