Download App

Ahmednagar News : भुजबळांच्या मंचावर बोलणारे राजकीय करिअर संपलेले नेते, मराठा समाज आक्रमक

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये (Ahmednagar News) ओबीसी मेळावा झाला. त्यानंतर मराठा व ओबीसी (Maratha and OBC) यामध्ये शीतयुद्ध आणखी वाढले आहे. त्यात नेतेमंडळी तसेच पदेगारी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहे. भुजबळांच्या मंचावर बोलणारे राजकीय करिअर संपलेले नेते आहेत. असं म्हणत सकल मराठा समाजाचे पदाधिकारी गोरख दळवी यांनी महादेव जानकार, लक्ष्मण हाके, गोपीचंद पडळकर आणि प्रकाश शेंडगे यांच्यावर निशाणा साधला.

मोठी बातमी! राज्यातील 7 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, पाहा कुणाकडे कोणता विभाग?

नगरमध्ये महा ओबीसीचा महाएल्गार मेळावा पार पडल्यानंतर आता मराठा समाजाकडून देखील राजकीय प्रतिक्रिया येत आहे. त्यामध्ये राजकीय करिअर संपलेले नेते मंडळी आपलं पुन्हा एकदा राजकीय अस्तित्व तयार करण्यासाठी भुजबळांच्या सोबतीने मंचावर दिसले. कारण येत्या काळात निवडणूक आहे त्या अनुषंगाने ही तयारी आहे असा आरोप सकल मराठा समाजाचे पदाधिकारी गोरख दळवी यांनी केला.

‘भारतीय लोकं आळशी असल्याचं नेहरुंचं मत’; PM मोदींनी भाषणाचा दाखलाच दिला…

ओबीसी आरक्षण बचाव साठी मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये नगर शहरांमध्ये महालगार मेळावा पार पडला. भुजबळांच्या आक्रमक भाषणानंतर आता त्याचे पडसाद नगर जिल्ह्यात उमटू लागले असून मराठा समाजाकडून आता प्रतिक्रिया येत आहे.

बिबट्याची डरकाळी जुन्नरमध्येच! बेनके, सोनवणेंच्या लढ्याला यश, बिबट सफारी प्रकल्पाला मंत्रिमंडळाची मंजुरी

मंत्री भुजबळ यांनी आपल्या जाहीर भाषणांमध्ये बोलताना म्हणाले की मराठा समाजाचा तुम्हाला बॉय कट करत असेल मराठा समाजावर बहिष्कार घाला यावर बोलताना मराठा समाजाचे दळवी म्हणाले की बहिष्काराची भाषा ही एकट्या भुजबळांच्या डोक्यात आहे त्यांच्यावरच येत्या काळामध्ये बहिष्कार पडणार आहे. आपल्या भाषांनातून असे वक्तव्य केल्याने एक जातीय दंगल घडले जाईल असा आरोप देखील देखील यावेळी बोलताना दळवी यांनी केला.

आज सर्व समाजामध्ये एकोपन तयार झालेला असताना आता जातीय तेढ निर्माण करण्याचे षडयंत्र हे आता भुजबळांकडून आखले जात आहे. छगन भुजबळ हे स्वतःच्या स्वार्थासाठी सहभाग घेत असल्याने अनेक नेतेमंडळी सगळीकडे पाठ दाखवत असल्याचं देखील यावेळी बोलताना दळवी म्हणाले. मंचावर जी उपस्थिती होती त्यांचे राजकीय करिअर हे संपलेले आहे पुन्हा आपले राजकीय करिअर बनवण्यासाठी या सभेच्या माध्यमातून ते एकत्र येत आहे.

follow us