मोठी बातमी! राज्यातील 7 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, पाहा कुणाकडे कोणता विभाग?

मोठी बातमी! राज्यातील 7 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, पाहा कुणाकडे कोणता विभाग?

Transfers of IAS Officers : राज्य सरकारकडून राज्यातील 7 आयएएस अधिकाऱ्यांच्या (Transfers of IAS Officers ) बदल्या करण्यात आल्या आहेत. तसेच कुणाकडे कोणता कारभार सोपवण्यात आला आहे? याची, सविस्तर यादी जाहीर करण्यात आली आहे.

काँग्रेसच्या गतीने काम केलं असतं तर100 पिढ्या निघून गेल्या असत्या, पीएम मोदींचा निशाणा

यामध्ये पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव (Saurabh rao) यांची बदली सहकारी संस्थेचे सहकार आयुक्त व निबंधक म्हणून करण्यात आली आहे. तर राव यांच्या जागी सी. एल. पुलकुंडवार पुण्याचे नवे विभागीय आयुक्त असणार आहेत. तसेच अनिल कवडे हे साखर आयुक्त असणार आहेत. तसेच या यादीमध्ये आणखी कोण-कोणत्या अधिकाऱ्यांची नावं आहेत? पाहुयात सविस्तर…

पाहा कुणाकडे कोणता विभाग?

सौरभ राव हे पुणे विभागाचे विभागीय आयुक्त आहेत. त्यांची बदली अनिल कवडे यांच्या जागी सहकारी संस्थेचे सहकार आयुक्त व निबंधक म्हणून झाली आहे. तर राव यांच्या जागी सी. एल. पुलकुंडवार हे पुण्याचे नवे विभागीय आयुक्त असणार आहेत. सहकारी संस्था पुणेचे सध्याचे सहकार आयुक्त व निबंधक असलेले अनिल कवडे यांची बदली पुण्याच्या साखर आयुक्तपदी झाली आहे.

‘भारतीय लोकं आळशी असल्याचं नेहरुंचं मत’; PM मोदींनी भाषणाचा दाखलाच दिला…

गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांची बदली राज्यसरकारच्या हाफकीन या औषधनिर्मिती प्राधिकरणाच्या व्यास्थापकीय संचालकपदी झाली आहे. तर सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डीके खिलारी यांच्याकडे आता इतर मागासवर्ग बहुजन कल्याण पुणेची जबाबदारी देण्यात आली आहे.

बिबट्याची डरकाळी जुन्नरमध्येच! बेनके, सोनवणेंच्या लढ्याला यश, बिबट सफारी प्रकल्पाला मंत्रिमंडळाची मंजुरी

धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता हे आता MAHADISCOM छत्रपती संभाजीनगरचे सहव्यस्थापकीय संचालक असणार आहेत. तर चंद्रपूर ITDP चे प्रकल्प अधिकारी आणि चंद्रपूर उपविभागचे सहाय्यक जिल्हाधिकारी असणारे मुरूगनाथम एम यांच्याकडे आता गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हा पदभार सोपविण्यात आला आहे. तसेच पांढरकवडा ITDP चे प्रकल्प अधिकारी आणि केळापूर उपविभाग यवतमाळच्या सहाय्यक जिल्हाधिकारी यशनी नागराजन यांच्याकडे सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीचा पदभार सोपविण्यात आला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube