Download App

Ahmednagar News : आज राष्ट्रपती नगर जिल्ह्यात; ‘या’ मार्गांनी वाहतूक वळवली

Ahmednagar News : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) आज नगर जिल्ह्यात येत आहेत. नेवासा तालुक्यातील शनि शिंगणापूर येथे (Ahmednagar) त्यांचे आगमन होणार आहे. झापवाडी, घोडेगाव या ठिकाणी बनविण्यात आलेल्या हेलिपॅड येथून मोटारीने शनिशिंगणापुर येथे जाणार आहेत. या काळात वाहनांच्या ताफ्यास अडथळा येऊ नये म्हणून नगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील वाहतूक वळविण्यात आली आहे. ही वाहतूक शेंडी बायपास ते नेवासा दरम्यानची जड वाहतूक खालील मार्गाने वळविण्याचे आदेश जारी केले आहेत. अहमदनगरकडून घोडेगाव मार्गे नेवासाकडे जाणाऱ्या जड वाहनांकरीता पर्यायी मार्ग-शेंडी बायपास-विळद बायपास-राहुरी-देवळाली प्रवरा-बेलापूर श्रीरामपूर-टाकळीभान मार्गे नेवासा अशी राहिल.

तसेच नेवासाकडून घोडेगाव मार्गे नगरकडे येणाऱ्या जड वाहनांकरीता पर्यायी मार्ग नेवासा-टाकळीभान-श्रीरामपूर-बेलापूर-देवळाली प्रवरा-राहुरी-विळद बायपास मार्गे नगर अशी वळविण्यात आली आहे. त्यामुळे या काळात या मार्गावर अवजड वाहनांना प्रवेश देण्यात येणार नाही.

Ganesh Visarjan 2023 : नगरमधील वाहतूक मार्गात मोठे बदल; ‘या’ मार्गांनी वाहतूक वळवली

नगर -छत्रपती संभाजी नगर या महामार्गावरील शेंडी बायपास ते नेवासा दरम्यान जड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. वाहतूक वळविणेबाबतचा आदेश दिनांक 30 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी ८ वाजेपासून ते दुपारी ३ वाजेपर्यंत लागू राहील. हा आदेश अॅम्ब्युलन्स, अग्निशामक दल, शासकीय वाहने, स्थानिक प्रशासनाकडून अत्यावश्यक कारणांमुळे प्रवेश देण्यात येणारे वाहनांना लागू राहणार नसल्याचे जिल्हा पोलीस दलाने सांगितले आहे.

Tags

follow us