Download App

Ram Shinde : विखेंनंतर राम शिंदेही भावी CM; ‘त्या’ व्हायरल पोस्टची चर्चा तर होणारच!

Ram Shinde : राज्याच्या राजकारणात कार्यकर्त्यांचं प्रेम अन् त्यातून नेता थेट मुख्यमंत्रीच होणार अशा भावना व्यक्त होणं नवीन नाही. नेत्यांच्या वाढदिवशी आपल्या नेत्यांचे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर हमखास दिसतातच. सोशल मीडियावर पोस्टही व्हायरल होतात. मग त्यात अजित पवार, जयंत पाटील, देवेंद्र फडणवीस, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे सगळेच आले. आता यात आणखी एका नेत्याची भर पडली आहे. भाजपाचे विधान परिषेदेचे आमदार राम शिंदे (Ram Shine) यांचेही भावी मुख्यमंत्री म्हणून फलक एक पोस्ट व्हायरल झाली आहे. या प्रकाराची नगर जिल्ह्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. याआधी असाच प्रकार महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याहीबाबतीत घडला होता.

तर विखे पाटील दहा वर्षांपूर्वीच CM झाले असते

आमदार राम शिंदे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून एक पोस्ट व्हायरल झाली आहे. शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना कार्यकर्त्यांनी भावी मुख्यमंत्री म्हणून राम शिंदे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ही पोस्ट सोशल मीडियावर पोस्टही केली आहे त्यामुळे पुन्हा एकदा भावी मुख्यमंत्रीच्या पोस्टवरून चर्चा सुरू झाल्या आहेत. राज्यात आगामी काळात लोकसभा तसेच विधानसभा निवडणुका होणार आहे. राजकीय नेतेमंडळी बरोबरच आता कार्यकर्ते देखील निवडणुकांच्या तयारीला लागले आहे. यातच काही दिवसांपासून राज्यात भावी मुख्यमंत्री म्हणून कार्यकर्ते आपल्या नेत्यांची बॅनर झळकवत आहे. नगर जिल्हयातील लोकप्रतिनिधी देखील मागे राहिले नाही. रोहित पवार, राधाकृष्ण विखे यांच्यापाठोपाठ आता भाजपचे आमदार राम शिदे यांचे देखील भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्ट एका कार्यकर्त्याने व्हायरल केली आहे.

पोस्टमध्ये नेमकं काय?

भाजप आमदार राम शिंदे यांचा वाढदिवस असल्याने शिंदे यांच्या उत्साही कार्यकर्त्याने थेट आपल्या नेत्याला शुभेच्छा देताना भावी मुख्यमंत्री असा उल्लेख पोस्टमध्ये केला आहे. राज्यात भावी मुख्यमंत्री म्हणून अनेक नेत्यांचे आमदार, खासदार यांचे बॅनर लागले तसेच चर्चाही झाल्या वाद विवाद झाले. आता या स्पर्धेत राम शिंदे यांची देखील एंट्री झाली. शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त देण्यात आलेल्या या शुभेच्छा पोस्टरची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Ram Shinde यांच्या हस्तक्षेपामुळे नगरपंचायतीत पदे रिक्त; शिंदेंविरोधात कॉंग्रेस-राष्ट्रवादी आक्रमक

आगामी काळात राज्यात मुख्यमंत्री कोण होणार यावरून अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. तसेच कार्यकर्त्यांकडून आपलाच नेता मुख्यमंत्री असे फलक लावले जात आहेत. या यादीत कधी देवेंद्र फडणवीसांचा, कधी अजित पवारांचा, कधी सुप्रिया सुळे, तर कधी जयंत पाटलांचा भावी मुख्यमंत्री उल्लेख करत बॅनरबाजी केली जाते. नगर जिल्ह्यातून राधाकृष्ण विखे पाटील तसेच रोहित पवार यांच्या नावाचे बॅनर झळकले होते. आता त्यांच्या पाठोपाठ राम शिंदे यांचीह भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्ट व्हायरल होत आहे.

follow us