Ram Shinde यांच्या हस्तक्षेपामुळे नगरपंचायतीत पदे रिक्त; शिंदेंविरोधात कॉंग्रेस-राष्ट्रवादी आक्रमक

Ram Shinde यांच्या हस्तक्षेपामुळे नगरपंचायतीत पदे रिक्त; शिंदेंविरोधात कॉंग्रेस-राष्ट्रवादी आक्रमक

Ram Shinde : अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत नगरपंचायतीच्या निवडणुकीनंतर आ.रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता आल्यावर सर्व कारभार व्यवस्थित चालू होता. मात्र मागच्या वर्षी प्रा.राम शिंदे विधानपरिषदेचे आमदार झाले. त्यानंतर लगेचच राज्यात सत्तांतर झाले. तेव्हापासून कर्जत नगरपंचायतीत राजकीय हस्तक्षेप सुरु झाला आहे.

Ahmednagar Crime : रस्तालूट करणारे चार सराईत गुन्हेगार अटकेत; नगर पोलिसांची कारवाई

त्यामुळे येथील महत्वाचे पदे रिक्त आहेत. आ.राम शिंदे सत्तेच्या बळावर राजकीय हस्तक्षेप करत महत्वाची पदांवर अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या होवू देत नाहीयेत. आम्ही जिल्हा प्रशासनाकडे वारंवार नगरपंचायतची इतर अधिकाऱ्यांची रिक्त पदे त्वरीत भरावीत यासाठी मागणी केली आहे. मात्र जिल्हा प्रशासन या महत्वाच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे. याच्या निषेधार्थ कर्जत नगरपंचायतीचे नगराध्यक्षा, उपनगराध्यक्षा व राष्ट्रवादी व कॉंग्रेसचे सर्व नगरसेवक उपोषण करत आहोत असे गटनेते संतोष म्हेत्रे म्हणाले.

मोठी बातमी : जालन्यात मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज, दगडफेकीनंतर पोलिसांचा हवेत गोळीबार

कर्जत नगरपंचायतमध्ये गेल्या दीड वर्षापासून प्रभारीराज आहे. कायमस्वरुपी मुख्याधिकारी, शहर अभियंता, पाणीपुरवठा अभियंता, लेखापाल, लेखापरिक्षक गट क व श्रेणी ब, सहाय्यक नगररचना (इंजिनिअर), कर निरीक्षक, सहाय्यक कर निरिक्षक व नगरपंचायतची इतर अनेक पदे रिक्त आहेत. याच्या निषेधार्थ कर्जत नगरपंचायतींच्या नगराध्यक्षा, उपनगराध्यक्षा व राष्ट्रवादी व कॉंग्रेसचे सर्व नगरसेवकांनी आज सकाळ पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे.

यावेळी नगराध्यक्षा उषा राऊत, उपनगराध्यक्षा रोहिणी घुले, गटनेते संतोष म्हेत्रे, नगरसेविका ताराबाई कुलथे, नगरसेवक भाऊसाहेब तोरडमल, सतीष तोरडमल, भास्कर भैलुमे, मोनाली तोटे, नामदेव राऊत, ज्योती शेळके, लंकाबाई खरात, सुवर्णा सुपेकर, अमृत काळदाते,प्रतिभा भैलुमे व छाया शेलार, प्रसाद ढोकरीकर, राष्ट्रवादी कॉंग्रसचे युवक शहराध्यक्ष प्रा.विशाल मेहेत्रे, अभय बोरा आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

नगराध्यक्षा उषा राऊत म्हणाल्या, कर्जत नगरपंचायतीत सर्व महत्वाची पदे रिक्त असल्याने त्याचा मोठा परीणाम दैनंदिन कामकाजावर मोठा परिणाम होत आहे. कर्जत नगरपंचायतीत राज्यातील सत्ताधारींच्या राजकीय हस्तक्षेपामुळे नागरिकांना वेठेस धरले जात आहे. त्यामुळे शहरातील सर्व प्रभागातील कामे मोठ्याप्रमाणात प्रलंबीत आहेत. कामाचे इस्टीमेट वेळेवर न होणे, झालेल्या कामांची बीले अदा न होणे, पंतप्रधान आवास योजना, रमाई आवास योजना, वैयक्तिक शौचालय प्रकरणे, बांधकाम परवाना, नवीन जागेच्या नोंदी, पाणी पुरवठा योजना, विद्युत विभाग व नगरसेवकांच्या प्रभागातील नागरी सुविधांची कामे शहराच्या विकासाची व सर्वसामान्य नागरिकांचे कामे मोठ्याप्रमाणावर ठप्प आहेत. वारंवार मागणी करूनही जिल्हा प्रशासन सहकार्य करत नाहीये. त्यामुळे आम्ही सर्व सत्ताधारींनी आजपासून येथे उपोषण सुरु केले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube