Download App

शिर्डी लोकसभा : उत्कर्षा रुपवतेंच्या प्रचाराला संगमनेरात सुरुवात

वंचित आघाडीच्या उत्कर्षा रुपवते यांनी आज संगमनेर तालुक्यातील खंडेश्वर मंदिरात नारळ वाढवून प्रचाराला सुरुवात केली.  

Shirdi Lok Sabha Election 2024 :शिर्डी लोकसभा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत होत आहे. वंचित बहुजन आघाडीच्या एन्ट्रीने निवडणूक अटीतटीची होणार आहे. महाविकास आघाडीचे भाऊसाहेब वाकचौरे आणि महायुतीकडून विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे मैदानात आहेत. तर वंचित आघाडीने उत्कर्षा रुपवते यांना उमेदवारी दिली आहे. या उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. वंचित आघाडीच्या उत्कर्षा रुपवते यांनी आज संगमनेर तालुक्यातील खंडेश्वर मंदिरात नारळ वाढवून प्रचाराला सुरुवात केली. निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजयी होऊ असा विश्वास रुपवतेंनी यावेळी व्यक्त केला.

शिर्डी लोकसभेची लढाई धनशक्ती विरुध्द जनशक्ती; उत्कर्षा रूपवतेंचा आजी-माजींवर हल्लाबोल

शिर्डी मतदारसंघात वंचित आघाडीने उत्कर्षा रुपवतेंना तिकीट दिले. रुपवते याआधी काँग्रेसकडून इच्छुक होत्या. परंतु, जागावाटपात हा मतदारसंघ ठाकरे गटाच्या वाट्याला गेला. त्यानंतर रुपवतेंनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. आता त्या निवडणुकीच्या मैदानात आहेत आणि याच मतदारसंघातील आजी माजी खासदारांना आव्हान देत आहेत. रुपवतेंनी प्रचारातही आघाडी घेतली आहे.

ज्यांना निवडून दिलं त्यांनी जनतेसाठी काय केलं?

आज रुपवतेंनी संगमनेर तालुक्यातील खंडेश्वर मंदिरात नारळ वाढवून प्रचाराला सुरुवात केली. गेली पंधरा वर्षे जे खासदार निवडून गेले आहेत त्यांनी जनतेसाठी काय केले? प्रचारात केवळ त्यांनी किती खोके घेतले? कुणी किती तुप घोटाळा केला? एवढाच प्रचार चालू आहे. जनतेचे प्रश्न न मांडता केवळ वैयक्तिक टीका चालू आहे. सर्व समाजाला मुख्य प्रवाहात आणून त्यांचा विकास करण्याची गरज आहे असे मत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांनी व्यक्त केले.

Lok Sabha Election : शिर्डीत तिरंगी लढत, उत्कर्षा रुपवते यांना वंचितकडून उमेदवारी

शिर्डीत तिरंगी लढत

महायुतीकडून दोन टर्म खासदार सदाशिव लोखंडे हे उमेदवार आहेत. तर महाविकास आघाडीकडून माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे उमेदवार आहेत. शिर्डीत दुरंगी लढत होईल, असे वातावरण होते. परंतु आता रुपवते याही लोकसभेच्या रिंगणात उतरल्या आहेत. त्यामुळे या मतदारसंघात आता तिहेरी सामना होणार आहे.

उत्कर्षा रुपवतेंना राजकीय वारसा

उत्कर्षा रुपवते या काँग्रेसचे नेते स्वर्गीय प्रेमानंद रुपवते यांच्या कन्या आहेत. माजी मंत्री दादासाहेब रुपवते यांच्या उत्कर्षा रुपवते नात आहेत. त्या काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या म्हणून काम पाहत होत्या. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा त्यांनी अनेकदा पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त केली होती. पंरतु ही जागा महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला गेली. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. त्यामुळे त्यांना आता त्या वंचितकडून रिंगणात उतरल्या आहेत.

follow us