Download App

‘कोण काय बोलतो यापेक्षा वरिष्ठांचा निर्णय महत्वाचा’; जागावाटपावर खासदार लंकेंचे सूचक विधान

महाविकास आघाडीचे वरिष्ट नेते शरद पवार, नाना पटोले, उद्धव ठाकरे हे जागावाटपाचा निर्णय घेतील. ते जो काही निर्णय घेतील, तो निर्णय आम्हाला मान्य

  • Written By: Last Updated:

नगर : पारनेर विधानसभा (Parner Assembly) मतदारसंघावरून महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) चांगली चुरस निर्माण झाली. पारनेरची जागा शिवसेना (ठाकरे गटाला) मिळावी, अशी मागणी शिवसैनिकांनी केली. तर या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटाने) देखील दावा केला. राष्ट्रवादीकडून विद्यमान खासदार लंके यांच्या पत्नी इच्छुक असल्याचे बोललं जातंय. याबाबत खासदार निलेश लंक (Nilesh Lanke) यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी पारनेरची जागा कुणाला सुटावी, या निर्णयाचा चेंडू वरिष्ठ नेत्यांच्या गोटात ढकलला.

‘…तर पवारांच्या इशाऱ्यावर जरांगे आंदोलन करत होते हे स्पष्ट’; प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान 

निलेश लंके यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. दरम्यान, पारनरेच्या जागेवर ठाकरे गटाने दावा केला, त्यामुळं मविआत रस्सीखेत दिसत आहे, याविषयी विचारलं असता लंके म्हणाले की, रस्सीखेचचा विषय नाही. खालच्या पातळीवर कोण काय बोलतं, हे महत्वाचं नसतं. प्रत्येकाला असं वाटतंय की आमच्या पक्षाला जागा सुटावी. मलाच उमेदवारी मिळावी. त्यात इच्छुकाचं काही चूक नसतं. शेवटी पक्षाला नेते मंडळी असतात. महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते शरद पवार, नाना पटोले, उद्धव ठाकरे हे जागावाटपाचा निर्णय घेतील. ते जो काही निर्णय घेतील, तो निर्णय आम्हाला मान्य असेल, असं लंके म्हणाले.

‘…तर पवारांच्या इशाऱ्यावर जरांगे आंदोलन करत होते हे स्पष्ट’; प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान 

पुढं बोलतांना त्यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, प्रशासन हे सत्तेतील लोकांचे ऐकून विरोधकांना दाबण्याचं काम करतं. आजही आमची अनेक कामं रखडून ठेवली आहेत, असं म्हणत सत्ता आज ना उद्या बदलणार आहे, असा सूचक इशाराही लंकेंनी दिला.

पारनेर मतदारसंघात निलेश लंके यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन खासदारकीची निवडणूक लढवली होती आणि ते लोकसभा निवडणुकीत खासदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांच्य जागा त्यांच्या पत्नी राणी लंके उभ्या राहणार असल्याचे संकेत खुद्द निलेश लंके यांनी दिले होतं. त्या पार्श्वभूमीवर राणी लंके सध्या पारनेर मतदारसंघात विविध कार्यक्रमांसह मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत.

तर ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले यांनी पारनेर मतदारसंघ शिवसेनेला देण्यात यावा, अशी मागणी केली. त्यामुळं पारनेरची जागा कोणत्या पक्षाला सुटते, हेच पाहणं महत्वाचं आहे.

follow us