Download App

Ahmednagar : शिर्डी लोकसभा! ‘महायुती धर्म पाळा’… आठवलेंच्या उमेदवारीसाठी आरपीआय आक्रमक

Ahmednagar : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर महायुतीकडून शिर्डी लोकसभेसाठी ( Ahmednagar ) रामदास आठवले यांची उमेदवारी जाहीर होत नसल्याने दक्षिणेतील पदाधिकारी नाराज झाले आहे. आरपीआयच्या पदाधिकाऱ्यांनी शहरात बैठक घेवून त्यांची तातडीने उमेदवारी जाहीर व्हावी अशी मागणी केली आहे. आरपीआयला शिर्डी व सोलापूरची जागा देवून त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले. या दोन्ही जागेवर विचार न झाल्यास रिपाईसह संपूर्ण आंबेडकरी अनुयायी वेगळा विचार करणार असल्याचा इशारा देवून दबावतंत्राचा वापर रिपाईच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सुरु केला आहे. दरम्यान महायुतीमधून शिवसेनेसह आता मनसे देखील या जागेसाठी आग्रही आहे.

‘आंबेडकरांशी युती नसेल तरीही जिंकणारच’; संजय राऊतांनी थेट सांगून टाकलं

शिर्डी लोकसभा हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. या ठिकाणचे शिंदे गटाचे खासदार सदाशिव लोखंडे हे उमेदवारीसाठी धडपड करत असताना महायुतीमधून हि जागा आरपीआयसाठी सोडण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान आठवले यांच्या उमेदवारीसाठी नगर शहरात आठवले गटाची एक बैठक पार पडली. यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील साळवे म्हणाले की, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया भाजप बरोबर दहा वर्षापासून प्रामाणिकपणे काम करत आहे. भाजपने सत्तेत 10 टक्के वाटा देण्याचे आश्‍वासन दिले होते. केंद्रात पक्षाचे राष्ट्रीय नेते आठवले यांना राज्यमंत्रीपद देण्यात आले, मात्र ते वगळता केंद्रात अथवा राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही.

Government Schemes : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेचा लाभ कोणाला अन् कसा घेता येईल?

या लोकसभेत पक्षाच्या वतीने शिर्डीसाठी रामदास आठवले व सोलापूरसाठी प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरोदे यांची उमेदवारीची मागणी करण्यात आलेली आहे. मात्र अद्यापि या दोन जागेसाठी महायुतीकडून निर्णय होत नसल्याने रिपाईच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. भाजप व मित्र पक्षांनी युतीचा धर्म पाळवा, फक्त निवडणुकीपुरते वापर करुन घेवू नये. या दोन्ही जागांसाठी राज्यातील आंबेडकरी अनुयायी गंभीर असून, दोन्ही जागा महायुतीचा धर्म पाळून रिपाईला द्याव्या. या दोन्ही जागेचा विचार न झाल्यास रिपाई व आंबेडकर जनता महायुती सोबत राहणार नाही. आरपीआयला डावण्यात आल्यास याचा परिणाम इतर मतदार संघावर होणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

महायुतीचा उमेदवार ठरेना

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या शिर्डीच्या जागेसाठी शिंदे गटातून सदाशिव लोखंडे हे पुन्हा एकदा उत्सुक आहे. तर मतदारसंघामध्ये लोखंडे यांच्याविषयी असलेली नाराजीचा फायदा घेत भाजप देखील या जागेवर उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. तर मनसे महायुतीमध्ये समाविष्ट झाल्यास शिर्डीची जागा मनसेला सोडण्यात येईल अशी देखील चर्चा आहे. मात्र महायुतीने आरीपायला डावलू नये व युती धर्म पाळत हि जागा रामदास आठवलेंसाठी सोडावी अशी मागणी करत आहे. मात्र असे असले तरी अद्याप महायुतीकडून या ठिकाणचा उमेदवार निश्चित झालेला नाही आहे. यामुळे ते नेमकी कोणाला संधी देणार हे येत्या काळात स्पष्ट होईल.

follow us