Ahmednagar News : शिर्डीत दिवसाढवळ्या गोळीबार; आरोपी फरार

Ahmednagar News : शिर्डीत दिवसाढवळ्या गोळीबार; आरोपी फरार

Ahmednagar News : शिर्डी शहरातील (Shirdi) खासगी पार्किंगमध्ये दुपारच्या सुमारास गोळीबार (Gun Fire) झाल्याची माहिची समोर आली आहे. सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. शिर्डी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत. बंदुकीतून दोन गोळ्या झाडण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. गोळीबार करून आरोपी फरार झाले असून शिर्डी शहरात भरदिवसा गोळीबाराची घटना घडल्यामुळे एकच खळबळ माजली आहे.

राजकीय पक्ष कोणतेही आश्वासन देऊ शकतात का? जाणून घ्या, कसा होतो तयार निवडणुकीचा जाहीरनामा…

गुरूवारी दुपारच्या सुमारास शिर्डी शहरातील खासगी पार्किंगमध्ये भरदिवसा हा गोळीबार झाला. मात्र, गाेळीबार का झाला, नेमकं काेणी केला? हे अद्याप समजू शकलेले नाही. आरोपींनी बंदूकीतून दोन गोळ्या झाडल्या. त्यापैकी एक गोळी एका हॉटलेमधील रुमची काच तोडून आत घुसली. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही किंवा कोणतीही जीवितहानी झालेली नाही. गोळीबारानंतर आरोपींनी तेथून लागलीच पलायन केले.

सद्गगुरु जग्गी वासुदेव यांच्या भक्तांसाठी चिंतेची बातमी : मेंदूवर पार पडली मोठी शस्त्रक्रिया

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच शिर्डी पोलिस घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी पुढील तपास सुरू केला आहे. गोळीबार झाला तिथे व आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मिळतंय का याचाही पोलिस शोध घेत आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube