शिर्डी लोकसभेवर भाजपचा दावा; ‘या’ उमेदवारांच्या नावांची चर्चा
Shirdi Loksabha : अहमदनगर (Ahmednagar)जिल्ह्यातील नगर दक्षिण (Nagar Loksabha)व शिर्डी लोकसभा (Shirdi Loksabha)मतदारसंघ सध्या चांगलेच चर्चेत आहेत. शिर्डीचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande)हे तिसऱ्यांदा लोकसभेची आस मनात धरुन असतानाच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. भाजपकडून या मतदारसंघावर दावा करण्यात येत आहे. खासदार लोखंडेंवरती असलेली नाराजी पाहता भाजपकडून या ठिकाणी उमेदवार दिला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामध्ये नितीन उदमले (Nitin Udamale)यांचे नाव चर्चेत आहे तर महावितरणचे अधिकारी राहिलेले विश्वनाथ निर्वान (Vishwanath Nirvan)हे देखील लोकसभेसाठी आग्रही आहेत. दरम्यान भाजपकडून अद्याप कोणाचेही नाव जाहीर करण्यात आलेले नाही.
दरवर्षी महिलांना मिळणार १ लाख रुपये, कॉंग्रेसच्या महिलांसाठी पाच मोठ्या घोषणा
शिर्डी लोकसभा मतदार संघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. यामध्ये गेली दोन टर्म शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे हे निवडून आले. मात्र मतदारसंघात लोखंडे यांच्याविषयी जनतेत नाराजी आहे तर लोखंडे यांना उमेदवारी देण्यात येऊ नये, अशी मागणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून होऊ लागले आहे. यामुळे या जागेवर भाजपकडून दावा करण्यात येऊ लागला आहे. भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांच्या नेहमी संपर्कात असलेले भाजपाचे किसान मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष नितीन उदमले यांचे नाव चर्चेत आहे, तर महावितरणचे अधिकारी राहिलेले विश्वनाथ निर्वाण यांचे नाव देखील चर्चेत आहे. लोकसभेची उमेदवारी मिळावी अशी मागणी देखील निर्वान यांनी केली आहे.
‘फडणवीसांना एक चूक महागात पडणार’; मनोज जरांगेंनी कडक शब्दांत सुनावलं
कोण आहेत नितीन उदमले?
भाजपकडून चर्चेत असलेले उदमले राजकारणामध्ये आपलं नशीब आजमावण्यासाठी सज्ज आहेत. 2014 मध्ये आपकडून त्यांनी निवडणूक लढवली मात्र तेव्हा त्यांचा पराभव झाला होता. अपयशानंतर ते आम आदमी पक्षामध्ये फारसे सक्रिय राहिले नाही. 2014 ला उदमले यांनी भाजपात प्रवेश केला. 2019 ला ही लोकसभेसाठी त्यांचं नाव चर्चेमध्ये होतं मात्र ही जागा शिवसेनेकडे असल्याने त्यांनी शांत राहणे पसंत केले. पुन्हा एकदा त्यांनी 2024 च्या शिर्डी लोकसभेची तयारी केली आहे.
अधिकारी निर्वान यांचे नाव चर्चेत
गेली अनेक वर्ष महावितरणमध्ये क्लास वन अधिकारी राहिलेले विश्वनाथ निर्वान हे देखील भाजपचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. विद्यमान खासदारांवरती असलेली जनतेची नाराजी पाहता विश्वनाथ निर्वाण यांनी लोकसभा लढवण्याची तयारी केली. तसेच भाजपाकडून आपल्याला तिकीट मिळावे, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. शिर्डी लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून दोन अधिकारी लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. मात्र अद्याप भाजपकडून याबाबत कोणाच्याही नावाची घोषणा करण्यात आली नाही.
शिर्डी लोकसभा निवडणुकीची मदार ही नगर जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर आहे. जागा वाटपाची यादीही अंतिम टप्प्यात असतानाच शिर्डीची जागा भाजपला मिळावी, अशी आग्रही मागणी कार्यकर्त्यांकडून देखील करण्यात आली आहे. असे झाल्यास भाजपाकडून नितीन उदमले व विश्वनाथ निर्वान यांची नाव चर्चेत आहे.