‘आंबेडकरांशी युती नसेल तरीही जिंकणारच’; संजय राऊतांनी थेट सांगून टाकलं
Sanjay Raut On prakash Ambedkar : राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांचं (Loksabha Election) वारं वाहत आहे. सर्वच पक्षांकडून मतदारसंघात, उमेदवार आणि जागावाटपांची लगबग सुरु असल्याचं दिसून येत आहे. अशातच आता सत्ताधाऱ्यांना शह देण्यासाठी महाविकास आघाडीकडून वंचित बहुजन आघाडीसोबत युती करण्यात आली खरी पण ही युती फार दिवस टिकली नाही. कारण जागावाटपाच्या मुद्द्यावरुन प्रकाश आंबेडकरांच्या (Prakash Ambedkar) वंचित आघाडीचं आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचं एकमत न झाल्याने युती तुटल्याचं दिसून येत आहे. त्यावरच बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी वंचितच्या युतीबाबत थेट सांगून टाकलं आहे. प्रकाश आंबेडकरांशी युती नसेल तरीही महाविकास आघाडीचं निवडणूका जिंकणार असल्याचा दावा राऊतांनी केला आहे.
BJP Candidate List : वरुण गांधींचा पत्ता कट, मनेका गांधींना ‘या’ मतदारसंघातून मिळाली उमेदवारी
संजय राऊत म्हणाले, महाविकास आघाडीच्या 15 ते 16 जागा आम्ही उद्या जाहीर करणार आहोत. प्रकाश आंबेडकर वंचितांचे नेते आहेत. ते आमच्यासोबत पाहिजेत असं मला वाटतं. त्यांच्यासाठी कालही आमचे प्रयत्न होते, आजही आहेत आणि उद्याही असतील, परंतू आम्ही त्यांना 4 जागांचा प्रस्ताव दिलायं. आता त्यांच्यावर आहे प्रस्ताव मान्य करायचा की नाही. महाविकास आघाडीमध्ये चार ते पाच पक्ष सामिल असून सर्वांना जागा मिळायला हव्यात. चार जागांचा प्रस्ताव आम्ही दिला आहे ज्या जागा त्यांनी मागितल्या होत्या त्याच जागा आम्ही दिल्या आहेत. मविआच्या मागे जनमत आहे. प्रकाश आंबेडकर आमच्यासोबत असते तर विजय आणखी दैदिप्यमान झाला असता आम्ही स्वावलंबी आहोत. राज्यातल्या शोषित पिडीत जनता आमच्यासोबत आहे, आंबेडकरांशी युती नसेल तरीही आम्हीचं जिंकणार असल्याचं संजय राऊतांनी स्पष्ट केलं आहे.
मुरलीधर मोहोळ यांनी गिरीश बापटांना छळले होते : पवारांना भेटताच धंगेकरांचा मोठा आरोप
मागील अनेक दिवसांपासून वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत समावेश करुन घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्यासह संजय राऊतांकडून शर्थीचे प्रयत्न केले जात होते. अखेर वंचित बहुजन आघाडीचा काही अटी आणि शर्थींवर समावेश झाला खरा मात्र जागावाटपाच्या बैठकीतून प्रकाश आंबेडकर अर्ध्यातूनच माघारी फिरले असल्याचं दिसून आलं होतं. मुंबईतील एका हॉटेलमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांच्यासोबत आंबेडकरांची बैठक पार पडली. या बैठकीत आंबेडकरांना महाविकास आघाडीकडून चार जागांचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. मात्र प्रकाश आंबेडकरांनी चार जागांचा प्रस्ताव देत वंचित बहुजन आघाडीचा अवमान केला असल्याच्या टीकेचं एक पत्रक जाहीर केलं होतं. त्यानंतर युती राहणार की नाही याबाबत शंका व्यक्त केला जात होत होती. अखेर जागावाटपाच्या मुद्द्यावरुन ही युती तुटली आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीकडून आम्हाला चार जागांचा प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र आम्हाला देत असलेल्या चारही जागा तुम्हालाच ठेवा असा सूर प्रकाश आंबेडकरांकडून आवळण्यात आला असून ठाकरे गटासोबत युती तुटली असल्याचंही आंबेडकरांनी जाहीर केलं आहे. आता पुन्हा संजय राऊतांनी वंचितने दिलेल्या प्रस्तावाचा विचार करावा अन्यथा आंबेडकरांशी युती नसेल तरीही आम्हीच जिंकणार असल्याचं विधान केलं आहे.