Share market fraud : अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात शेअर मार्केटच्या नावाखाली नागरिकांना कोट्यावधींचा गंडा (Share market fraud) घातला जात असल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. शेवगाव तालुका हिटलिस्टवर असतानाच आता नगर शहरामध्येही ‘शेवगाव स्कॅम पॅटर्न’ (Shevgaon Scam Pattarn) उघडकीस आलायं. नगर शहरातीलही दोन गुंतवणूकदारांना ठग्यांनी 76 लाखांना गंडा घातलायं. या प्रकरणी गुंतवणूकदारांनी अॅड. शुभम साके यांच्यामार्फत याचिका दाखल केल्यानंतर आज अतिरिक्त जिल्हा न्यायालयाच्या आदेशाने आरोपी निकेश शिंदे (रा. पिंपळगाव माळवी) याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलायं.
नेमकं प्रकरण काय?
निकेश शिंदे असं या आरोपीचं नाव असून त्याने श्रीकांत तवले आणि राजेंद्र ससाणे यांची भेट घेत माझी पुण्यात इन्व्हेस्टिंग वर्ल्ड नामक कंपनी असून तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करा, तुम्हाला दर महिन्याला चांगला परतावा देणार असल्याचं अमिष दाखवलं. तसेच तुम्ही आत्ता गुंतवणूक करीत असलेली रक्कम तुम्हाला हवी त्यावेळी संपूर्ण परताव्यासह तातडीने परत देईल, असा विश्वास दाखवला. त्यानंतर तवले आणि ससाणे दोघांनी मिळून वेळोवेळी निकेश शिंदेला एकूण 76 लाख रुपयांची रक्कम दिली.
Ground Report : भारती पवारांना ‘कांदा’ रडवणार? प्रचारापासून भुजबळांचं अंतरही डोकेदुखी
काही महिने शिंदे याने दोघांनाही परताव्याची रक्कम दिली. मात्र, काही दिवसांनंतर परताव्याची रक्कम देण्यास शिंदे याने टाळाटाळ केल्यानंतर गुंतवणूकदार ससाणे आणि तवले यांनी गुंतवलेली संपूर्ण रक्कम परत मागितली, त्यानंतर शिंदे याने प्रतिसाद देणं बंद केलं. शिंदे याच्याशी कुठलाही संपर्क होत नसल्याने तवले आणि ससाणे यांनी पुण्यातील पिंपळे सौदागरमधील शिंदेच्या कार्यालयात धाव घेतली असता कार्यालय बंद करुन निकेश शिंदे फरार झाला असल्याचं समजलं.
Pune Accident : होय, मी दारु पिऊन गाडी चालवत होतो; बिल्डर पुत्राची पोलिसांना कबुली
आपली फसवणूक झाल्याचं समजताच दोघांनीही पोलिसांत तक्रार देण्यासाठी गेले मात्र, पोलिसांकडून म्हणावं तसा प्रतिसाद न मिळाल्याने अॅड. शुभम साके यांच्यामार्फत अतिरिक्त जिल्हा न्यायालयात याचिका दाखल करुन आपलं म्हणणं सादर केलं. त्यानंतर न्यायालयाने आरोपी निकेश शिंदे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आरोपी निकेश शिंदे याच्यावर कलम 420, 406 एमपीआयडी 3 /4 अंतर्गत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलायं.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून शेअर मार्केटच्या नावाखाली होत असलेल्या फसवणुकीमुळे शेवगाव तालुका चांगलाच चर्चेत आलायं. आता नगर शहरातही असे ट्रेडर तयार होत असल्याची प्रचिती आलीयं. शेअर मार्केटचा हा बबल आता फुटू लागल्याने अनेक प्रकार समोर येऊ लागले आहेत. या प्रकरणी पोलिसांसह न्यायालयाकडून गुन्हे दाखल करण्याचे काम सुरु असले तरी ही फसवणूक थांबणार का? असा सवाल सध्या सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जातोयं.